कॅन्सर सेंटरसाठी 45 कोटींचा प्रस्ताव

0
नाशिक । संदर्भ सेवा रुग्णालयात कॅन्सर सेंटरच्या विस्तारीकरणासाठी खा. हेमंत गोडसे यांनी केंद्र शासनाकडे या सेंटरसाठी 45 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. यात दोन अतिरिक्त मजले बांधून तेथे वाढीव 100 खाटांचे नियोजन करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला आहे.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात संपूर्ण महाराष्ट्रातून येणार्‍या रुग्णांना उपचार दिले जातात. संदर्भ सेवा रुग्णालयाकरिता आधुनिक मशीनरी, साहित्यांची मागणी करण्यात आली असल्याचे खा. गोडसे यांनी सांगितले.

त्यामध्ये अत्याधुनिक किरणोपचार मशीन तसेच आँकोलॉजी केअर, पॉसिट्रॉन इमिशन टोमोग्राफी मशीन, एमआरआय मशीन, पॅथॉलॉजी विभाग, अनुभवी डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी, बोनमॅरो ट्रान्सप्लान्टकरिता सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर आदी प्रस्तावित आहे. कॅन्सरवरील उपचारासाठी सध्या रुग्णांना मुंबई, पुणे आदी ठिकाणी उपचारासाठी जावे लागते.

त्यासाठी येणारा खर्चही खूप असतो. ही सोय उपलब्ध झाल्यास नाशिकमध्येच उपचार घेता येणे शक्य होणार आहे. सध्या कॅन्सर रुग्णांसाठी 20 खाटा व अधिकच्या 30 खाटांचे नियोजन करून तेथे हा प्रकल्प राबवण्याचे नियोजित करण्यात आले आहे.

सदरचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्तावित केला असून आपण त्याचा पाठपुरावा करून त्यास लवकरात लवकर मंजूर करून आणू, असे खा. गोडसे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*