सोयाबीन खरेदीसाठी सव्वाशे केंद्रे सुरू करण्याचा नाफेडला प्रस्ताव; 18 ऑक्टोबरपासून खरेदी

0

मुंबई | शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदीसाठी पणन महामंडळाकडून राज्यातील 23 जिल्ह्यांत 125 ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव नाफेडकडे देण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून 18 ऑक्टोबरपासून किमान आधारभूत किंमतीने सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहेतर मूग आणि उडिदाची खरेदी 16 ऑक्टोबरपासून करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पणन महामंडळाकडून सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव नाफेडकडे पाठविण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत ही केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या केंद्रांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांकडून जवळपास 35 लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी अपेक्षित आहे.

मूग आणि उडीदाच्या खरेदीसाठी गेल्या 3 ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. याच केंद्रावर सोयाबीन खरेदीसाठीही नोंदणी करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी अशी केंद्रे उपलब्ध नाहीतत्या ठिकाणी दोन दिवसात म्हणजे 11 ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी नवीन केंद्रे सुरू करण्यात येतील.

मूग आणि उडिदाची खरेदी 16 ऑक्टोबरपासून तर सोयाबीनची खरेदी 18 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी केंद्रावर आपल्या शेतमालाच्या विक्रीसाठी नोंदणी करुन घेण्याचे शासनाकडून कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*