Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

महापालिकेतील 73 कर्मचार्‍यांना कालबद्ध पदोन्नती

Share
थकीत करधारकांची नावे झळकली फ्लेक्सवर, Latest News Taxpayer Name Flex Amc Action Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेत 12 व 24 वर्षे सेवा केलेल्या 73 कर्मचार्‍यांना शासकीय नियमानुसार पदोन्नती देण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त महापालिकेत आयोजित कार्यक्रमात महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते या कर्मचार्‍यांना या नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपमहापौर मालनताई ढोणे, उपायुक्त सुनील पवार, डॉ. प्रदीप पठारे, महिला व बालकल्याण समिती सभापती लताताई शेळके, आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ, अस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे आदी उपस्थित होते.

महापौर वाकळे म्हणाले, महापालिकेतर्फे नगरकरांना दिल्या जाणार्‍या मूलभूत नागरी सुविधा योग्य रीतीने नागरिकांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी कर्मचार्‍यांवर असते. सर्व कर्मचार्‍यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरवासीयांना चांगल्या सुविधा देण्याचा आणि नगर शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्याचा संकल्प केला, ही बाब कौतुकास्पद आहे. संकल्प पूर्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग म्हणाले, शहरातील नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी महापालिका प्रशासन नेहमीच कार्यरत असते. ज्या कर्मचार्‍यांनी चांगली सेवा केली त्यांना 12 वर्षांनंतर आणि 24 वर्षांनंतर कालबद्ध पदोन्नती देणे नियमानुसार बंधनकारक आहे. हा त्या कर्मचार्‍यांचा हक्क आहे. त्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!