Type to search

Featured नाशिक

नाशिक ग्रामीण कार्यक्षेत्रात शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश

Share

नाशिक | प्रतिनिधी

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांनी नाशिक ग्रामीण कार्यक्षेत्रात 13 जानेवारी  2020 रात्री 12.00 वाजेपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1951चे 37(1) (3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.

सदरचे आदेश लग्नकार्य, धार्मिक कार्यक्रम, आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास संबंधीत तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांची रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!