चिमुकल्यांनी घेतला भाजीबाजाराचा प्रत्यक्ष अनुभव

0
नाशिक | मानवधन सामाजिक व शैक्षणिक संस्था पाथर्डी फाटा येथील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडियम स्कूल  या शाळेत विद्यार्थ्यासाठी भाजीमंडई तयार करून विद्यार्थ्यांना शेतमाल विकून त्यातून व्यवसायाचे धडे देण्यात आले.

विद्यार्थ्यांनी भाजीमंडईचा प्रत्यक्ष अनुभव  स्वकृतीतून घेतला. विद्यार्थ्यांना सर्व भाज्यांची ओळख करून देऊन त्यांचे महत्व यावेळी सांगितले गेले.

त्यानंतर भाजी मंडई त्यातून विद्यार्थ्यांना खरेदी -विक्री ,व्यापार ,देवाण-घेवाण यांचे मार्गदर्शन कृतीद्वारे करण्यात आले. यातून विज्ञान,भूगोल,गणित तसेच जीवनमूल्याचे ज्ञान देण्यात आले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कोल्हे व सचिव ज्योती कोल्हे यांच्या संकल्पनेतून शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला होता.

शेतकरी शेतमाल किती कष्टातून पिकवितो तो बाजारपेठेपर्यंत कसा आणतो तसेच आपले आई-वडील हा शेतमाल खरेदी करतांना किती पैसे मोजतात याविषयी संपूर्ण मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना दिले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

*