सायबर क्राईम बाबत दक्षता हवी

0
जुने नाशिक : सध्या धावपळीच्या युगात सोशल मिडियाचा वापर मोठ्याप्रमाणात होत आहे, मात्र याचा फायदा घेऊन काही लोक त्याचा दुरूपयोग करीत आहे.

सध्या सायबर क्राईमच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तरी प्रत्येकाने दक्षता घेतली संभाव्य घटना टाळता येऊ शकते, असे सायबर क्राईम तज्ञ शोहेब पटेल यांनी व्यक्त केले.
येथील दि फैज मर्कंटाईल को-ऑप बँकेच्या वतीने आज वडाळानाका येथील स्क्वेअर हॉटेलमध्ये सायबर क्राईम बाबत जागृतीसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पटेल बोलत होते.

त्यांनी विविध प्रकारचे उदाहरण देत जगात ‘हॅकींग’ च्या घटनांचा उल्लेख केला. त्याच प्रमाणे बँकींग क्षेत्राला देखील याचा मोठा धोका असून ऑनलाईन कामे करतांना संगणकावर येणार्‍या इतर गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला देखील दिला.

कार्यक्रमात बँकेचे चेअरमन अ‍ॅड. अन्सार सय्यद, व्हाईस चेअरमन फारुक शेख, संचालक सय्यद आसीफअली, आसीफ शेख, सोहेल काझी, डॉ. सादीक शेख, रफत शेख, फैज अर्बनचे चेअरमन सादीक पटेल, ज्येष्ठ विधीतज्ञ अ‍ॅड. एम.टी. क्यु. सय्यद, अ‍ॅड. मिन्हाज काझी, फैजचे सल्लागार अ‍ॅड. सलिम शेख, जुबेर हाश्मी, मोसीन खान, जाहीद शेख यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन मुख्याधिकारी नासीर शेख यांनी केले तर आभार व्यवस्थापक सुरेश जोशी यांनी मानले.

LEAVE A REPLY

*