महिला सुरक्षिततेसाठी ट्रॅकिंग डिव्हाइसची निर्मिती; नाशिकच्या प्राध्यापकाचे संशोधन

30 किमी. आत कळते रिअल टाईम लोकेशन

0

देशदूत डिजिटल विशेष 

नाशिक | सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पोलीस यंत्रणा अशा गुन्ह्यांचे प्रमाण कमी करत जरी असली तरी अद्याप या प्रकारची गुन्हेगारी कमी झालेली दिसून येत नाही.

कॉल सेन्टर, बिपिओ, हॉस्पिटल्स याठिकाणी २४ तास सेवा सुरु असतात. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही नोकरी करतांना नजरेस पडतात.

स्त्रियांनी अश्या रात्री-अपरात्री प्रवास करताना स्वतःची काळजी घेणे हा सर्वात चांगला उपाय आहे. हल्ली सर्वांकडेच कॅमेरे असलेले मोबाईल फोन असले तरीही ट्रॅकिंग डिव्हाइसची गरज आहे.

ती रिअल टाईम देखरेखीच्या आणि माहितीच्या आधारे आपल्या जवळील व्यक्तीची स्थिती कळण्याची अश्या लाईव्ह माहितीच्या आधारे काही अघटीत जर घडणार असेल तर  घरातील आपल्या जवळच्या व्यक्ती वेळीच शोध सुरु करू शकतो.

पोलिसांची त्वरित मदत घेवून त्या स्थळी पोहचू शकतो.मुख्य म्हणजे इंटरनेट असो वा नसो केवळ सॉफ्टवेअर घरातील कॉम्प्यूटर वर टाकून व्यक्तीकडे ट्रॅकिंग डिव्हाइस ठेवले कि सहज सर्व माहिती आपणास प्राप्त होते.

नाशिकमधील महावीर एज्युकेशन सोसायटीच्या संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग विभागात कार्यरत असलेल्या विपिनकुमार पवार आणि त्यांच्या संशोधन सहाय्यक मोनाली कदम यांनी नुकत्याच एका  ट्रॅकिंग डिव्हाइसची निर्मिती केली आहे.

व्यक्तीने आपल्या कपड्यात अथवा पर्स मध्ये हे डिव्हाइस ठेवल्यास  गुगल मेप अक्षांश आणि रेखांशाच्या माध्यमातून त्याचे कोणत्याही क्षणी निश्तिच ठिकाण लक्षात येणार आहे. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे संशोधने नाशिकमधून संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मार्फत होत असतांनाच प्राध्यापकांनी बनविलेली “व्हीकेजजीपी ट्रक” या ट्रॅकिंग डिव्हाइस आणि प्रणाली महिला सुरक्षा तंत्रज्ञानातील शिरपेच ठरली आहे.

सामन्यांच्या आवाक्यात आणि वापरण्यास सोपी सिस्टम  असून अगदी अनोळखी आणि निर्जनस्थळी सुद्धा काम करते, मुख्य म्हणजे अतिशय हलक्या वजनाची हि यंत्रणा असून तिचे वजन केवळ १०० ग्राम इतके आहे.

५ व्होल्ट​ पोव्हर वर चालणारी हि यंत्रणा जगातील एकूण उपग्रहांपैकी १३ उपग्रहांमार्फत आलेल्या माहितीचा आढावा घेऊन ती विश्लेषण करणारी आहे . सदर यंत्रणा वाहनामध्ये बसविल्यास वाहनाचे वेग, त्याचे गुगल नकाश्यावर सध्याचे स्थान, तसेच वाहन चढावर आहे कि सपाट जमिनीवर आहे.

अशी काम करते यंत्रणा : प्रथम प्रवासास जाणाऱ्या व्यक्तीस दिलेले ट्रॅकिंग डिव्हाइस चालू केले जाते. ट्रॅकिंग डिव्हाइस चालू स्थितीत सिग्नल्स आणि डाटा ब्रॉडकास्ट करते. 30 किलोमीटर च्या आत असलेल्या घरातील व्यक्तींना त्या व्यक्तीची माहिती कॉम्प्युटर वर मिळते जर पोलीस यंत्रना हे वापरत असेल तर दिलेल्या विशीष्ट क्रमांकाच्या आधारे रेस्क्यू टीमही त्या व्यक्तीचा शोध घेवू शकते.

सदर यंत्रणा प्रत्यक्ष त्या जमिनीवरच जावून ७-१२ काढण्यासाठी, वनविभाग झाडांची कत्तल आणि तस्करी रोकण्यासाठी जंगली श्वापद जसे वाघ, सिंह सारखे वन्य प्राणी यांचे मोजमाप आणि त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी, जलसंपदा विभागाला पाणी चोरी थांबवण्यासाठी, बस महामंडळाला वाहनाची सध्याची स्थिती पाहण्यासाठी ही यंत्रणा मदतपूर्ण ठरू शकते .सदर यंत्रणा सध्या पारीमानिक विश्लेषणासाठी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध असून लवकरच आम्ही बाजारात उपलब्ध करून देणार आहोत असे यावेळी प्रा विपिनकुमार  पवार यांनी सांगितले आहे.

 

LEAVE A REPLY

*