अवकाळी पावसामुळे यंदा द्राक्ष उत्पादनात घट; सामान्यांसाठीही द्राक्ष होणार आबंट

0
नाशिक ।  अपेक्षित नसलेला उन्हाळा, त्यामुळे द्राक्षवेलींवर झालेला परिणाम, पडलेला मुसळधार पाऊस त्यानंतरही अवकाळी पावसाचा ऑक्टोबरपर्यंत वाढलेला मुक्काम याचा परिणाम यंदा द्राक्षपिकांवर होताना दिसत आहे. अवकाळी पावसाचे पाणी जमिनीवर मोठ्या प्रमाणात मुरल्याने ते आर्द्रतेने बाहेर पडत आहे. त्यामुळे द्राक्ष घडांमध्ये तसेच वेलींमध्ये ते तसेच राहिल्याने यंदा द्राक्षांचे उत्पादन 30 ते 50 टक्के कमी होणार आहे.

मागील वर्षी अनुकूल हवामानामुळे द्राक्षांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले होते. परंतु यंदा प्रतिकूल हवामानामुळे द्राक्षपिकांना मोठया प्रमाणावर फटका बसला. त्यात10 सप्टेंबरनंतर प्लॉट तसेच छाटणी झालेल्या द्राक्षांचे 50 टक्के उत्पादन कमी होणार आहे. तर 20 सप्टेंबरनंतरच्या द्राक्षांचे 40 टक्के आणि 25 सप्टेंबरनंतर छाटणी झालेल्या द्राक्षवेलींच्या उत्पादनात 10 टक्कयांची घट येणार आहे.

परंतु एकूण विचार केल्यास एकूण उत्पन्नात यंदा 30 ते 50 टक्के घट येण्याची भीती द्राक्ष उत्पादकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम किमतीवर होवून सामान्यांना द्राक्ष आंबट लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा अपेक्षित उन्हाळा नसल्यामुळे योग्य ते जीवनसत्व द्राक्षवेलींना मिळाले नाहीत. शिवाय पावसाने थेट ऑक्टोबरपर्यंत तळ ठोकल्याने द्राक्षवेलींसह जमिनीतही मोठ्या प्रमाणात पाण्याचा अंश वाढला.

त्यामुळे हे पाणी न सुकल्यामुळे गळकुज रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर दिसू लागला. त्यामुळे आपोआपच द्राक्षांचे घडही कमी तयार होवू लागले आहेत. काही ठिकाणी हे उत्पादन निम्म्यापर्यंत घटण्याची शक्यता आहे. अपेक्षित प्रकाश तसेच पाण्याचा अतिरिक्त मारामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

द्राक्षांच्या गुणवत्तेवरही यंदा परिणाम होण्याची शक्यता असून त्यांची चवही बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. उत्पादनच कमी होणार असल्याने बाजारातही द्राक्षांची हवी तशी आवक होणार नाही. त्यामुळे सामान्यांनाही द्राक्षांची चव चाखण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे.

पावसाचा परिणाम : यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्यानेही द्राक्ष पिकांना अपेक्षेपेक्षा जास्त पाणी मिळाले. परंतु पाणी जास्त झाल्याचा परिणाम पिकाच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला. पिकांवर रोग पडून त्यांची उत्पादकता घटल्यामुळे यंदा उत्पन्नही कमी होणार आहे. याशिवाय अपेक्षित ऊन न मिळाल्याने देखील द्राक्षांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला.

गळकुज रोगावर उपाय नाही : 2008 नंतर द्राक्ष पिकावर गळकुज रोगाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले. परंतु या रोगाबाबत शासनाच्या कृषी विभागाला सांगूनही त्यावर उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गळकुज ही द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी ठरली आहे.
मनोज जाधव, द्राक्ष उत्पादक

LEAVE A REPLY

*