Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशदेशात दररोज चार लाख पीपीई किट्स निर्मिती

देशात दररोज चार लाख पीपीई किट्स निर्मिती

सार्वमत

नवी दिल्ली – एकीकडे करोनामुळे देशातील विविध उद्योग आणि व्यवसाय अडचणीत आले आहेत, तर दुसरीकडे दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत देशात पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट) किट्सची मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. देशात दररोज सुमारे चार लाख पीपीई किट्स तयार केल्या जात आहेत. त्यामुळे पीपीई किट्सची वार्षिक उलाढाल 20 हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

या उद्योगाशी संबंधित जाणकारांच्या मते, आगामी काळात पीपीई किट्सचा व्यवसाय आणखी वाढेल. दररोज सुमारे चार लाख पीपीई किट्स तयार केल्या जात असून त्यांचा वापर देशात केला जात आहे. मे महिन्यात, जेथे दरमहा एक हजार कोटींचा व्यवसाय होता, तो जूनमध्ये 1500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. यानुसार बाजारपेठेत वर्षाला 18 ते 20 हजार कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकते. विशेष म्हणजे करोना नसलेल्या रुग्णांवर उपचार करणार्‍या रुग्णालयांकडून देखील पीपीई किट्सची मागणी वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि देशातील शास्त्रज्ञांनी सांगितले की, करोनाबरोबर जगण्याची सवय करावी लागेल. यामुळे येत्या काळात पीपीई किट्सच्या व्यवसायात आणखी वाढ होईल, असा उद्योजकांचा अंदाज आहे. काही काळानंतर या किट्सची निर्यातही करता येईल.

दररोज 40 कोटींचे किट्स
असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाईस इंडस्ट्रीचे (एआयएमईडी) समन्वयक राजीव नाथ यांनी सांगितले, सध्या दररोज दोन लाख पीपीई किट्स केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिल्या जात आहेत. तसेच त्या पीपीई किट्स विविध राज्ये व खाजगी क्षेत्रातील रुग्णालयात पुरविल्या जात आहेत. एका पीपीई किटची किंमत 500 ते 2 हजार रुपयांपर्यंत आहे. रोज 40 कोटी रुपयांच्या पीपीई किट्स बनवून विकल्या जातात. जून महिन्यात हा आकडा दररोज 50 कोटी रुपये असा होऊ शकतो. दरम्यान, एन-95 मास्क आणि सर्जिकल मास्कची मागणीदेखील वाढली आहे. मास्कची बाजारपेठ एक हजार कोटींच्या पुढे गेली आहे. पीपीई आणि मास्क तयार करणार्‍यांची संख्या 200 पर्यंत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या