५ ऑक्टोबरपासून प्रो कब्बडीचा थरार रंगणार

0
file photo

मुंबई : प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच प्रो-कबड्डीचे आयोजक मार्शल स्पोर्ट्स यांनी अधिकृत तारखेची घोषणा केली आहे. ५ ऑक्टोबरपासून हा थरार रंगणार आहे.

क्रिकेटनंतर भारतात सर्वाधिक प्रेक्षकांची पसंती प्रो-कबड्डीस मिळाली आहे. कबड्डीप्रेमींना ३ महिने कबड्डीचा आनंद घेता येणार असून, ५ जानेवारी २०१९ रोजी सहाव्या हंगामाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

पाचव्या हंगामामध्ये प्रो-कबड्डीतील सहभागी संघांची संख्या ८ वरुन १२ वर करण्यात आली. यंदाच्या हंगामातही १२ संघ सहभागी होणार आहेत. पटणा पायरेट्स संघाने गेल्या ३ हंगामाचं विजेतेपद पटकावतं हॅटट्रिक साजरी केली आहे.

सहाव्या हंगामासाठी झालेल्या लिलावात तब्बल ६ खेळाडूंवर १ कोटी आणि त्यापेक्षा जास्त रुपयांची बोली लागली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामाचं विजेतेपद कोण पटकावतं याकडे सर्व कबड्डीप्रेमींचं लक्ष असणार आहे.

LEAVE A REPLY

*