Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

प्रियांकाचा विवाहसोहळा वादाच्या भोवऱ्यात

Share

मुंबई : ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा जोधपूर येथील उमेद भवनामध्ये भव्यदिव्य विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या या जंगी विवाहानंतर त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षावही झाला. मात्र, तिच्या लग्नात प्राण्यांचा वापर केला गेल्यामुळे ‘पेटा’ या प्राणी सुरक्षा संस्थेने तिव्र नाराजी व्यक्त केली. ‘पेटा’ (PETA)ने याबाबत प्रियांका आणि निकला उद्देशून एक ट्विट केले आहे.

प्रियांका निकच्या लग्नात हत्ती आणि घोड्यांचा वापर करण्यात आला. यासंबंधी ‘पेटा’ने त्यांच्या ट्विटमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत लग्नात प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कशाप्रकारचे साधन वापरले जातात. त्यामुळे त्यांना कसा त्रास होतो, हे दाखवण्यात आले आहे.

Tweet: 

प्रियांकाच्या लग्नात हत्ती आणि घोड्यांचा वापर झाल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत, ‘हल्ली अनेकजण जनावरांच्या पाठीवर बसून करण्यात येणारी सफारीही नाकारतात, लग्नसोहळ्यांमध्येही घोड्यांचा वापर टाळतात. तुम्हाला या खास दिवसाचा अपार आनंद असेल; पण प्राणीमात्रांसाठी आजचा हा दिवस नक्कीच चांगला नाही’, असं PETAकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये लिहिण्यात आलं.

पेटाकडून निराशा व्यक्त होण्यापूर्वी ‘देसी गर्ल’चा विवाहसोहळा आणखी एका कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. एकिकडे फटाके वाजवू नका, वायू प्रदूषण करु नका असं म्हणणाऱ्या प्रियांकाने स्वत:च्या लग्नसोहळ्याची ग्वाही देण्याकरता मात्र आतिषबाजीला प्राधान्य दिलं. ज्यामुळे तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच नाराजीचा सूर आळवला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!