Type to search

हिट-चाट

निकशी लग्न करेल असं कधीच वाटलं नव्हतं : प्रियंका चोप्रा

Share
मुंबई- प्रियंका चोप्रा आणि निक जोनास त्यांच्या लग्नानंतर नेहमीच एकत्र एन्जॉय करताना दिसतात. नुकतचं प्रियंका वुमन इन द वर्ल्ड समिटमध्ये दाखल झाली होती. या समिटमध्ये प्रियंकाने तिच्या रिलेशनशिप, वैवाहिक जीवन आणि महिलांविषयी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. या पॅनल चर्चेदरम्यान प्रियंकाने मी निकशी लग्न करेल असं कधीच वाटलं नसल्याचं म्हटलंय. समिटमध्ये प्रियंकाने तिच्या आणि निकच्या नात्याबाबत अनेक खुलासे केले. प्रियंकाने ती आणि निक जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते त्यावेळी निकने अनेकदा मला आश्चर्यचकित केल्याचं सांगितलं. मी निकला गेल्या 2 वर्षांपासून ओळखते. निक अतिशय समजूतदार, हुशार आणि माझ्यासाठी खूप चांगला आहे. मी अतिशय बिनधास्त मुलगी आहे. मला नेहमी जे वाटतं ते मी करते आणि यासाठी निक नेहमीच मला सपोर्ट करत असल्याचंही यावेळी प्रियंकाने सांगितलं.

प्रियंकाने त्यांच्या रिलेशिपच्या सुरूवातीच्या दिवसांतील एका घटनेबाबतही उल्लेख केला आहे. मी एक दिवस माझ्या मित्र-मैत्रिणींसोबत नाईट आउटचा प्लान करत होती. त्याच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं होतं. त्यावेळी निकने मला मी त्या लोकांपैकी नाही की, तुला काम रद्द करण्यास सांगेन. मला माहित आहे आता तु जिथे आहे तिथे पोहचण्यासाठी तु किती मेहनत करत आहे. तु तुझ्या कामाला कमी महत्त्व देऊ नये असं मला वाटतं. तु तुझं काम पूर्ण करून ये, आम्ही तुझी वाट पाहू. असं निकने म्हटल्यांच प्रियंकाने सांगितलं. मी आज जे काही कमावलं आहे त्याचं श्रेय निकने मला दिलं आणि ही गोष्ट माझ्यासाठी अतिशय आश्चर्यकारक असल्याचं प्रियंकाने म्हटलं.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!