Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : भेदभाव बंद; यापुढे खासगी आणि सरकारी योजनेतील घरे एकाच इमारतीत – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

Share

नाशिक | प्रतिनिधी

सरकारी योजनेतून दिल्या जाणाऱ्या घरांचा दर्जा इतर खासगी घरांपेक्षा हलका असतो. अनेकदा कंपन्या सरकारी योजनेतील घरे वेगळ्या ठिकाणी आणि खासगी घरे वेगळ्या ठिकाणी बांधतात. हा भेदभाव बंद करून खासगी आणि सरकारी योजनेतील घरे एकाच इमारतीत असतील असा निर्णय लवकरच महाराष्ट्र राज्यशासन घेणार असल्याचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

आव्हाड यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, सरकारी संकुल निर्मिती करणाऱ्या कंपन्या शासकीय संकुल इतरत्र बांधतात आणि खासगी संकुल उत्तम सुविधासह वेगळ्या जागी बांधतात. त्यामुळे शासकीय योजनेमध्ये सरकारी कर्मचारी, पोलीस हे घरे घेण्यासाठी पुढे येत नाहीत.

 

घर नसल्याने पोलीस किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करताना नजरेस पडतात. त्यामुळे यापुढे समान सदनिकांचे वाटप समान सुविधांसह देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.

ते म्हणाले, म्हाडाच्या २००० घरांची लॉटरी काढली जाणार आहे. यात १००० पोलिसांना आणि १००० चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना घरे दिली जाणार आहेत.

पुढच्या काळात पाच लाख घरे निर्माण करणार असून ५० हजार पोलीस आणि ५० हजार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
दरम्यान, आव्हाड यांच्या ट्विटरवर अनेकांनी आव्हाड यांना सूचना केलेल्या आहेत. यात भाडेकरूंची पिळवणूक होत आहे. तसेच 1989 मध्ये म्हाडा ने 100 महिने भाडे भरून मालक बनायची योजना आणली होती. ती सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे कृपया पाठपुरावा करावा असेही एका युजरने सुचवले आहे.

दुसरीकडे गिरणी कामगारांच्या घरांबाबत कधी निर्णय होणार? गिरणी कामगार गिरण्या बंद झाल्यावर देशोधडीला लागला आणि आता फक्त काही कामगारांना घर देऊन बाकीच्यांना अनेक वर्षे वाटच पाहायला लागतेय, महाविकास आघाडी त्यांना योग्य न्याय देईल ही अपेक्षा असल्याचे एका युजरने म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!