मुख्यमंत्री प्रकाश मेहतांचा राजीनामा का घेत नाही : पृथ्वीराज चव्हाण

0

अहमदनगर : राज्य सरकार भ्रष्टचाराचे प्रकरणे उघड होत आहे. एकनाथ खडसेंनंतर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता भ्रष्टचाराच्या प्रकरणात अडकले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहतांची चौकशीचे आदेश दिले आहे.
भ्रष्टचाराच्या आरोपात तथ्य आढळल्याने चौकशी लावण्यात आली आहे.यामुळे मुख्यमंत्री फडणवीस मंत्री मेहतांचा राजीनामा का घेत नाहीअसा प्रश्‍न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नगरमध्ये उपस्थित केला.

राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत प्रामाणिक नाही. शेतकरी आंदोलनामुळे सरकारने घाई घाईत कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, कर्जमाफीसाठी पैशाची तरतूद कोठून करणार हे मात्र फडणवीस सरकार सांगत नाही. कर्जमाफी संदर्भात रोज नवीन नियम करुन कर्जमाफीचा 34 हजार कोटीचा आकडा कमी करण्याचा डाव आहे.

मराठा-मुस्लिम आरक्षण बाबत बोलताना चव्हाण म्हणाले , आम्ही या दोन्ही समाजाला आरक्षण जाहीर केले होते. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सरकार सत्तेत आल्यास हे आरक्षण ते रद्द करतील असे सांगितले होते. त्याप्रमाणे भाजप सरकारने मराठा-मुस्लिम आरक्षण रद्द केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

*