blog : छोट्या शहरातील मोठा पत्रकार

0
उमेश अलोणे, इतरांसारखा एक सर्वसामान्य मुलगा. पत्रकारिता हा त्याचा ध्यास. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील हर्सूल या छोट्याशा गावातून मेहनतीने पूढे आलेला एक तरुण. एक एक लहान-मोठ्या वृत्तत्रात काम करत अनुभवाच्या जोरावर इलेक्ट्रिनिक माध्यमात(वृत्तवाहिनी) नोकरी मिळवून आपले कर्तृत्त्व सिद्ध करणारा एक मनस्वी मुलगा.

त्याची काम करण्याची पद्धती, झपाटलेपण आणि कल्पकता पाहुन त्याला एका राष्ट्रीय पातळीवरील वाहिनीवर गलेलठ्ठ पगारीच्या नोकरीची संधी घरचालत आली. त्यावेळी मी ही एका इंग्रजी दैनिकासाठी वृत्तकारातीचे काम करीत असे. उमेश मुंबईत आला. त्यावेळी मी बोरिवलीत राहत असे. काही दिवसातच मी आणि उमेश लोकलच्या प्रवासाला सारावलो. त्याची आणि माझी भेट दररोज होत असे.

एक दिवस उमेश नाराज होऊन माझ्याकडे आला आणि म्हणाला, घडाळाच्या काट्याला बांधून लोकलला लटकत कचकचून बांधलेले जीवन मला नकोय. हे शहर माझे नाही. इथे मला कितीही पगार मिळत असला तरी हे विश्व माझे नाही. वातानुकूलित चार भितींच्या आत माझे मन रमणार नाही. माझी घुसमट होत आहे. माझ्या लोकांसाठी, माझ्या मातीत मला कमी पगाराची नोकरी मिळाली तरी मी ती स्वीकारेल… मला त्याचे हे संवाद हास्यस्पद वाटले…. कोण सोडणार इलेक्ट्रिानिक माध्यमातील प्रतिष्ठित नोकरी……?

एक दिवशी सकाळीच माझा फोन खणखणला… समोरून उमेशचा आवाज आला…. मी सकाळीच त्या वृत्तवाहिनीच्या उपसंपादक पदाचा राजीनामा दिला आहे….तो देतांना एक अट मी संपादकांना घातली ती अशी जर तुम्ही मला माझ्या जिल्ह्यात रिपोर्टरची नोकरी देणार असाल तर मी तिथे जाऊन पत्रकारिता करेल अन्यथा मला नोकरी सोडावी लागेल…

मी उताविळ होऊन विचारले… मग काय म्हणाले संपादक….?
अजून काहीच उत्त्तर आले नाही… मी आठ दिवस मुंबईत आहे. नंतर पॅकअप करुन गावी निघतोय…..! मी हदरलोच…..काय हा खुळचटपणा ?

मी शांतपणे त्याला म्हणालो…याच नगरीत अनेकांची आयुष्य उभी राहली आहेत. ही स्वप्न नगरी आहे. उमेश शांतपणे उत्तरला… ही कसली स्वप्न नगरी? मुंबईतील इतर लोकांसारखे दोन-चार तास लोकलला लटकून मला यंत्र व्हायचे नाही. भलेही मला चार-दोन हजार पगार कमी मिळाला तरी चालेल …

मी गावाकडे जाऊन पत्रकारिता करणार आहे….. हे कसले भिकेचे डोहाळे? माझा प्रतिप्रश्न…. त्याचा निर्धार ठाम होता. सर्वच जण मुंबईत येऊन शहरी पत्रकारिता करु लागले तर गावाकडची पत्रकारिता कोण करणार? वातानुकूलित गगणचुंबी इमारतीत बसून वाहिन्याकरिता बातम्या संपादित करणे हे माझ्या ऊर्जेला, उत्साहाला बांधुन टाकणारे आहे. माझा श्वास घुसमटोय येथे. यापेक्षा माझ्या गावाकडे माझ्या गावकरांर्‍यासाठी पत्रकारिता करण्यास मला जास्त आनंद होईल. आणि माझ्या वयोंवृद्ध पालकांना माझा आधार होईल.

उमेश कालांतराने अकोल्यात गेला. त्या वाहिनीने त्याची अट मान्य केली. त्याचा राजीनामा न स्वीाकारता त्याला अकोल्याचा मुख्य बातमीदार म्हणून काम दिले. आज तो आत्मविश्वासाने छोट्या शहराला मोठे करणार्‍या बातम्या त्याच वृत्तवाहिनीसाठी देत आहे. उमेश एकाच महिन्यात मुंबई सोडून अकोल्याला परतला पराभूत न होता. एक स्वच्छ ध्येय डोळ्यांसमोर ठेऊन … त्यानंतर तो मला अनेक महिन्यांनी औरंगाबादला भेटला….

एकदा अशाच कुठल्या कामासाठी तो आला होता.. त्याच्या चेहर्‍यावर आता पहिल्यापेक्षा अधिक आत्मविश्वास आणि समाधान मला दिसले. पैशांपेक्षा आपल्या शहराला, कुटुंबाला मोठ्या करण्याचा त्याचामधील पत्रकार मला अधिक भावला… मी त्याला विचारले ….. कसा आहेस विदर्भात… मंद स्मित हास्य करून तो म्हणाला.. मस्त… त्याच्या मस्त शब्दानंतर मला त्याच्या डोळ्यात जग जिंकल्याचा आनंद जाणवत होता…

पैश्यांपेक्षा आपल्या शहराला मोठे करणारा उमेश मला अधिक सच्चा वाटला.. मी नाशिकला जाण्यासाठी जनशताब्दी एक्सप्रेस पकडली आणि त्याने विदर्भ एक्सप्रेस पकडली…. गर्दीतून वाट काढत मी गर्दींचा एक भाग होऊन प्रवास सुरु केला आणि त्याने मोकळ्या रेल्वेत आरामशीर पणे चढत अकोल्यासाठी प्रयाण सुरू केले..

आज सकाळी त्याचे सोशल माध्यमांवरचे पान उघडताच मला त्याला पुरस्कार मिळाल्याची बातमी वाचली… पठ्ठ्याने विवाह केला… एका मुलाचा बाप झाला… 5 रुमचा फ्लॅटही घेतला त्याच छोट्या शहरात…
मनात विचांर आला. खरचंच तो आज लहान शहरातला मोठ्ठा पत्रकार झालाय…..!

Prince of caves land

LEAVE A REPLY

*