Type to search

देश विदेश मुख्य बातम्या

ह्यूस्टनमध्ये ‘हाउडी मोदी’चा गजर; ४८ राज्यातील भारतीय जनसमुदाय उपस्थित

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेच्या ह्यूस्टन येथील NRG स्टेडियममध्ये ‘Howdy, Modi’ कार्यक्रमात जोरदार स्वागत करण्यात आले. हजारो भारतीय या कार्यक्रमासाठी आलेले होते. मोदी यांचे मनोभावे स्वागत अमेरिकेत स्थित असलेल्या भारतीयांनी केले. कलम ३७० रद्द केल्यानंतर अमेरिकेतील काश्मिरी पंडितांनी मोदींचे आभार मानले.

मोदी यांचे एनआरजी स्टेडीयममधील भाषण सुरु होताच मोदी मोदी गजर ऐकण्यास मिळाला. येथील नागरिकांच्या प्रचंड घोषणाबाजीने संपूर्ण स्टेडीयम दणाणले होते. मोदींनी भाषण सुरु करताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.

अमेरिकेत स्थित असलेल्या विनोद दीक्षित यांनी खास देशदूतच्या वाचकांसाठी काही व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केले आहेत. एकदा नक्की पाहा

अमेरिकेत एकमेकांना मित्रत्वाने अभिवादन करण्यासाठी हाऊडी (Howdy) हा शब्द वापरला जातो. अमेरिकतील हजारों लोक या कार्यक्रमाला आले असून हा कार्यक्रम तिथल्या भारतीयांसाठीसुद्धा महत्त्वाचा असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.

ह्यूस्टनमध्ये तब्बल 5,000 कार्यकर्त्यांनी NRG एरिनाची सजावट केली होती. तिथं राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये मोदी यांच्या भेटीविषयी प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते.

सुरुवातीला साधारण दोन तास संगीताचे विविध कार्यक्रम झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी दाखल झाले आणि काही वेळाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही NRG एरिनामध्ये दाखल झाले. राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची अशा प्रकारच्या एखाद्या क्रार्यक्रमाला उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ  होती.

अमेरिकेतील 48 राज्यांतील भारतीय समुदाय पंतप्रधान मोदींना ऐकण्यासाठी ह्यूस्टन येथे पोहोचला होता. हाऊडी मोदी कार्यक्रमात 60 हून अधिक अमेरिकन सासंद सहभागी होते. सुरुवातीचा सांस्कृतिक कार्यक्रम साधारण 90 मिनिटांचा होता दरम्यान, सांस्कृतिक कार्यक्रमात भारत-अमेरिकी समुदायाची विविधता दिसून आली.

टेक्सास आणि पूर्ण अमेरिकेतील 400 कलाकार 17 ग्रुप्समधून यामध्ये सहभागी झाले होते. स्टेडीयममध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात कलाकारांनी अविरत कलेचे अनोखा अविष्कार सादर केला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!