Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

Video : जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका; काश्मीरचा मुकुट शाबूत ठेवण्याचे आवाहन

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था 

जम्मू आणि काश्मीरमधून स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारे ३७० कलम आणि ३७० कलम ३५ ए संसदेच्या दोन्ही सभागृहात हद्दपार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच संवाद साधला. दूरदर्शन वाहिनीवरून त्यांनी जनतेला संबोधित केले.

यावेळी ते म्हणाले की, लवकरच जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होतील आणि जम्मू काश्मीरच्या जनतेतूनच लोकप्रतिनिधी निवडणून येतील. तसेच लद्दाख औषधी वनस्पतींचे हब तयार होईल सोबतच याठिकाणी पर्यावरणावर काम करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मोदी पुढे म्हणाले की, इतर राज्यांमध्ये ज्या सुविधा सर्वसामान्य जनतेला मिळतात. त्या सुविधा काश्मिरी जनतेला मिळत नव्हत्या. त्या आता मिळण्यास सुरुवात होणार आहे. येथील सरकारी कर्मचारी अनेक सुविधांपासून वंचित होते. येथे दलितांसाठी वेगळे कायदे लागू होत नव्हते ते आता केंद्राप्रमाणे मिळणार आहेत. लवकरच राज्य शासनाच्या कामकाजासाठी येथे भरतीप्रक्रिया राबिविली जाणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.

मोदी यांचे संपूर्ण भाषण

 

मोदी उवाच

 • जम्मू आणि काश्मीरच्या मुलांना उच्च शिक्षण मिळणार
 • येथील भेदभाव दूर झाला
 • जम्मू आणि काश्मीर लवकरच ह्या सर्व्यातून बाहेर पडेल
 • येथे पर्यटन वाढेल
 • सरकारी सुविधा मिळण्यास सुलभता
 • रिक्त पडे लवकरच भरती होईल
 • सर्व सरकारी जागा भरणार
 • स्थानिक मुलांना प्राधान्य
 • आर्मी भरती काढणार
 • मुख्य प्रवाहात लवकरात लवकर आणणार
 • सर्व नियोजन बध्ह पाने सुरु आहे
 • अनेक प्रलंबित योजनंना गती मिळेल
 • विविध प्रोजेक्ट लवकरच सुरु होतील
 • पंचायत आणि विधानसभाचा अधिकार पूर्ण पणे बजावता येणार
 • जम्मू पुन्हा एकदा नव्या उंचीवर पोहोचेल
 • नागरिकांना निवडणूक लढवता येईल
 • येथील जनतेलाच निवडणुकीचा अधिकार राहील
 • पूर्वीसारखेच लोकप्रतिनिधी निवडणून येतील
 • विधानसभा निवडणुका व्हाव्यात
 • नवे लोकप्रतिनिधी निवडणूक येवोत
 • पूर्ण पारदर्शी पद्धतीने प्रतिनिधी निवडला जाईल
 • लोहमार्ग नव्याने बनतील
 • जम्मू काश्मीर येथील जनतेला गुड गव्हर्नस राहील
 • येथील युवा जम्मू आणि काश्मीच्या विकासाचे नेतृत्व करतील.
 • येथील महिलांना येथील विकासात सहभागी होण्यासाठी पुढे या
 • जम्मू काश्मीरमध्ये जगातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र होण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी पुढे या
 • चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी फक्त आणि फक्त काश्मीरला पसंती मिळत होती…यापुढेही मिळेल यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल
 • चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी बॉलीवूड, मोलीवूड ला आवाहन करतो की सर्वांनी लद्दाख आणि जम्मू काश्मीरमध्ये गुंतवणूक करा
 • डिजिटल संवादाला चालना मिळायला हवी
 • येथील उदरनिर्वाह येथील पर्यटनावर चालवा
 • खेळातून जम्मूतून जास्तीत जास्त योगदान मिळावे
 • काश्मीरचा मुलगा खेळात उत्तोरोत्तर प्रगती करो
 • काश्मीरचे केशर आणि लद्दाखचे हर्बल प्रोडक्ट जगभरात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा
 • लद्दाखमध्ये अनेक औषधी वनस्पती आहेत त्यांचा लाभ रुग्णांना मिळावा
 • खाद्य प्रक्रिया उद्योगासाठी प्रयत्न झाले पाहिजेत
 • लद्दाखची भूमी सौरउर्जेसाठी एक महत्वाचे ठिकाण आहे तिथे यावर काम व्हायला वाव आहे
 • जम्मू काश्मीर व लद्दाख विषयावर काहींनी मतदान केले काहींनी टाळले परंतु एकजूट करून यामध्ये एकत्रित येण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत
 • लद्दाख आणि जम्मू काश्मीरच्या जनतेचे दु:ख  हे देशातील १३० कोटी जनतेचे दु:ख आहे.
 • जम्मूतील परिस्थिती हळूहळू कमी होईल
 • जम्मू काश्मीरमध्ये ईद उत्सव साजरी करण्यास कुठलीही अडचण येणार नाही
 • जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेले सर्व जवानांचे आभार
 • जम्मू काश्मीर देशाचा मुकुट आहे, लहानपणापासून हे आपण ऐकत आलो आहोत.
 • येथील मौलवी गुलामदीन यांनीच भारताला पाकच्या घूसखोरीबाबत सांगितले त्यांना अशोकचक्र देण्यात आले
 • शहीद औरंगजेब यांचे दोन्ही भाऊ आज सेनेत दाखल होऊन देशाची सेवा करत आहेत.
 • येथील जनतेला आवाहन करतो की, सर्वांनी एकत्र या आपण सोबत मिळून नव्या भारतासोबत नव्या जम्मू काश्मीर आणि लद्दाखच्या निर्माणासाठी समोर या.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!