Video : पंतप्रधान मोदींचा पुन्हा एकदा ‘सब का साथ, सबका विकास’चा नारा

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संपूर्ण भाषण

0

नवी दिल्ली | २०१३ च्या गतीने विकास झाला असता तर अजून दोन दशकं वाट बघावी लागली असती. भाजप सरकार २०१४ साली सत्तेवर येताच देशात अनेक बदल बघायला मिळाले आहेत. पहिल्या भाषणातील स्वच्छता अभियानापासून ग्रामीण भागातील उज्जवला आणि सौभाग्य योजनेपर्यंत देशाने उत्तरोत्तर प्रगती केली आहे. अनेक ठिकाणी रस्ते बनले आहेत, दुप्पटीने रस्ता बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. तसेच २५ सप्टेंबर पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीपासून देशात पंतप्रधान आरोग्य योजनेला सुरुवत केली जाणार आहे. या योजनेद्वारे देशातील नागरिकांना पाच लाखांपर्यंत आरोग्य विम्याचा लाभ उठवता येणार आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या आधीच्या शेवटच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या चार वर्षातील विकासाचा लेखाजोखा आज मांडला. पुन्हा एकदा सबका साथ सबका विकासचा नारा याप्रसंगी मोदींनी दिला.

मोदी म्हणाले, देशातील कुठल्याची वर्गाला अडचणी यायला नको. त्यांना प्रगतीसाठी अवसर मिळायला हवा. दलित, महिला, आदिवासी यांच्यासह देशातील प्रत्येक नागरिक. जगात भारताची धमक असायला हवी. जे बडे देश देशात गुंतवणुकीसाठी तयार नव्हते ते आज गुंतवणुकीसाठी भारताची निवड करतात. गेल्या चार वर्षांत भारताच्या विकासात सर्वच क्षेत्रात मोठी भर पडली आहे. असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी गेल्या चार वर्षातील लेखाजोखा आज स्वातंत्र्यदिनाच्या पार्शभूमीवर सादर केला.

लाल किल्ल्यावरून साडेसात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात झाली. मोदी म्हणाले, सव्वाशे कोटी देशवासीयांची भागीदारी होईल . सव्वाशे कोटी स्वप्न, संकल्पना सोबत असतील तर देश नक्कीच प्रगतीपथावर जाईल.

२०१४ मध्ये देशवासी सरकार बनवून थांबले नव्हते तर ते देश एक करण्यासाठी प्रयत्न करत होते.  श्री अरविंद राष्ट्र काय आहे, आमची मातृभूमी काय आहे? याबाबत सुंदर स्पष्टीकरण दिले आहे.

देशाच्या प्रगतीच्या प्रवासाला २०१४ पासून कुठून सुरुवात झाली याबाबत माहिती दिली. २०१४ मध्ये देशविकासाची प्रगती काय काय होती. २०१३ च्या गतीने शौचालये बनवले असते तर अजून दोन दशके हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी लागली असती. गावागावात वीज पोहोचवली. २०१३ च्या गतीने एलपीजी गॅस कनेक्शन दिले असते तर अजून १०० वर्षे गॅस कनेक्शन मिळाले नसते.

देश एक आहे नवकल्पना, नवी उमंग घेऊन देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. आज देशात दुप्पटीने हायवे बनवत आहे. चार पटीने देशात घर बनवली जात आहेत. देश आज सगळ्याच क्षेत्रात अग्रेसर झाला आहे.

शाळांमध्ये शौचालय बनवत आहे. लहान लहान ठिकाणी कौशल्य विकास योजनेअंतर्गत रोजगार निर्मिती सुरु आहे. स्टार्ट अप, डिजिटल इंडिया अंतर्गत काम सुरु आहे. दिव्यांगांसाठी कॉमन साईन नावाची डिक्शनरी बनविण्याचे काम सुरु आहे.

स्प्रीक्लर शेती होत आहे. देशाचे लष्कर करुणा  माया ममता नुसार ठिकठिकाणी पोहोचत आहे. दुष्मनाला सर्जिकल स्ट्राईकने उत्तर देत आहे.  लक्ष्य मोठे असायला हवेत त्यातून पुढे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे प्रगती खुंटत नाही.

१३ कोटी नागरिकांनी मुद्रा लोन घेतले आहे. यात पहिल्यांदा कर्ज घेऊन व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक महिला आज मोठमोठे उद्योगधंदे चालवत आहेत. पुढील चार वर्षांत नवनवीन उपक्रम राबवून जगात भारत देशाच्या शेतकऱ्याची नवी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

देशात भारत मासेमारीत आज जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथेनॉलचे उत्पादन दुप्पटीने वाढले आहे. खादीची विक्री आज दुप्पटीने वाढली आहे.

उज्ज्वला योजना, सौभाग्य योजनेअंतर्गत गस आणि वीज पोहोचवली आहे. २०१४ मध्ये स्वच्छता अभियान सुरु केले तेव्हा लोकांनी माझ्या वक्तव्याचा विनोद केला होता. जागतिक आरोग्य संस्थेचा अहवाल आलेला आहे. त्यात देशातील स्वच्छतेमुळे साडेतीन लाख मुलांचे प्राण वाचले आहेत.

हे वर्ष राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना स्वच्छतेच्या माध्यमातून अभिवादन करणार आहोत. प्रधानमंत्री जनआरोग्य अभियानास सुरुवात करणार आहेत. पाच रुपयांपर्यंत आरोग्य इन्शुरन्स देण्यात येणार आहे. २५ सप्टेंबर पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीच्या दिवशी या योजनेला सुरुवात केली जाणार आहे. यामुळे गरीबालादेखील पाच लाखांपर्यंत आरोग्य विम्याचा लाभ उठवू शकणार आहे.

आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालाने नुकतेच पाच कोटी नागरिक गरिबीतून सशक्त झाले आहेत. 2013 मध्ये चार कोटी लोक कर अदा करत होते आज पावणेसात कोटी जनता आयकर भरत आहे.

प्रामाणिक करदात्यांचा देशाच्या विकासात मोठा वाटा, या करदात्यांमुळेच देशासाठी, गरिबांसाठी अनेक योजना राबवने शक्य झाले आहे.

 

 

LEAVE A REPLY

*