Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

बीएलओच्या कामातून प्राथमिक शिक्षकांना वगळले

Share

अंगणवाडी सेविका, लिपीकांकडून काम करून घेण्याचे आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना मतदान केंद्रीय अधिकारी (बीएलओच्या) कामातून वगळण्याचे आदेश जिल्हा निवडणूक विभागाने जिल्ह्यातील मतदान नोंदणी तथा उपविभागीय अधिकारी, साहय्यक नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांना दिले आहेत. मतदान केंद्रीय अधिकारीच्या कामातून वगळण्याची मागणी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी केेली होती. अन्यथा बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.

याबाबत जिल्हा निवडणूक विभागाने यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले होते. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने बीएलओ ऐवजी हे काम अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत लिपीक यांच्या मार्फत करण्याचे सुचविले आहे. यामुळे आता 1 जानेवारीपासून मतदान केंद्रीय अधिकारीच्या कामातून प्राथमिक शिक्षकांना वगळून कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!