Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

38 प्राथमिक शिक्षकांना नोटिसा

Share

शिक्षक बँक पदाधिकारी निवडीत घातला गोंधळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीत गोंधळ घालणार्‍या 38 प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नोटिसा धाडल्या आहेत. या शिक्षकांनी सार्वजनिक ठिकाणी गांेंधळ घालून जिल्हा परिषदेची बदनामी केल्याचा ठपका या शिक्षकांवर ठेवण्यात आला आहे. आता या शिक्षकांकडून खुलासे मागविण्यात येणार आहेत. मंगळवार (दि.9) रोजी जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीपूर्वीच काही शिक्षकांनी दोन संचालकांना पळविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी झालेल्या धराधरीत पळवून नेणार्‍या शिक्षकांसह संचालकांना वाचविणार्‍या शिक्षकांचे फोटो विविध वृत्तपत्रांत प्रसिध्द झाले आहेत. प्राथमिक शिक्षण विभागाने सभेच्या दुसर्‍या दिवसापासून या सर्व शिक्षकांचे फोटो संकलित केले असून त्या आधारे संबंधित शिक्षकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसमध्ये जिल्हा बँंकेच्या पदाधिकारी निवडीच्या दवशी झालेल्या गोंंधळाचे ठळक फोटो सर्वच वृत्तपत्रात प्रसिध्द झालेले आहेत. शिक्षकीपेक्षात प्रामाणिकपणे व निष्ठेने आपले शालेय कामकाज करणे आवश्यक असतांना आपण सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला. याप्रकारामुळे जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 चे नियम 3 चा भंग झालेला असून त्यामुळे आपणा विरोधात शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येवू नयेत, अशी नोटीस शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांनी 38 शिक्षकांना धाडल्या आहेत. यात गुरूमाऊली मंडळाच्या दोन्ही गटाच्या नेत्यांचा समावेश आहे.

गोंधळ घालणार्‍या शिक्षकांना पाठिशी घालण्यात येणार नाही. त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. त्या आधी त्यांचे खुलासे घेण्यात येणार असून त्यानंतर संबंधीत शिक्षकांच्या शाळेची तपासणी करण्यात येवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी काटमोरे यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!