Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

केरळ नन बलात्कार : मुख्य साक्षीदाराच्या मृत्यूने खळबळ

Share
जालंधर : बहुचर्चित केरळ नन बलात्कार प्रकरणातील मुख्य आणि महत्त्वाचे साक्षीदार असलेल्या फादर कुरियाकोस कट्टुथारा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. आज सकाळी जालंधरच्या दासुआ येथील एका चर्चमध्ये कुरियाकोस यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. कुरियाकोस यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसलं तरी त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या भावाने केला आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार त्यांना गेल्या काही दिवसांपासून धमक्या मिळत होत्या.बिशप फ्रँको मुलक्कल यांच्या विरोधात साक्ष दिली तर आपल्या बरोबर काय होईल याची भिती वाटते असे म्हटले होते. अलीकडेच मुलक्कल यांची जामिनावर सुटका झाली आहे. आपली सुटका हा एक चमत्कार असून पोलीस दबावाखाली काम करत आहेत असे मुलक्कल यांनी म्हटले होते. फ्रँको मुलक्कल याला केरळ हायकोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. २०१४ ते २०१६ या दोन वर्षात बिशप फ्रँकोने बलात्कार केल्याचा आरोप ननने केला होता.

कुरियाकोस त्यांची हत्या करण्यात आली की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी जालंधर पोलिस अधिक चौकशी करत आहेत. शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

कुटुंबियांना हत्येची शंका 

पादरी कुरिआकोसे कत्तूथारा यांच्या संशायास्पद मृत्यूमागे बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशप फ्रान्सो मुलाक्काल असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. केरळ पोलिसांसमोर कत्तूथारा यांनी फ्रान्सोविरोधात साक्ष दिली होती. त्यामुळे त्यांना मारण्यात आले असा आरोप त्यांनी केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!