Thursday, May 2, 2024
Homeनंदुरबारशहादा येथे पपईचा दर 7.11 रुपये

शहादा येथे पपईचा दर 7.11 रुपये

शहादा – Shahada – ता.प्र :

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे यांच्या सूचनेनुसार पपई दराचा तिढा सोडवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी, पपई उत्पादक शेतकरी समन्वय समिती व शेतकरी यांच्यात तब्बल चार तास चर्चा होऊन 7.11 रुपये पपईचा दर ठरविण्यात आला.

- Advertisement -

उत्तर भारतात पपईचे दर चांगले असूनही येथील पपई खरेदीदार व्यापारी कमी दरात शेतकर्‍यांकडून पपई खरेदी करत होते.

यासाठी पपई उत्पादक संघर्ष समितीने प्रशासनाला मध्यस्थी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार तहसील कार्यालयात प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव संजय चौधरी आणि पपई उत्पादक समन्वय समिती, व्यापारी, शेतकरी यांच्यात प्रदीर्घ चर्चा होऊनही तोडगा निघू शकला नाही.

अखेर प्रांताधिकार्‍यांनी समन्वयाने तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार व्यापारी शेतकर्‍यांमध्ये आज चर्चा झाली. त्यात तीन दिवसात उत्तर भारतातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे लॉकडाऊन होण्याची झाल्यास शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांचेही नुकसान होईल या हेतूने तातडीने बाजार समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. सुमारे चार तास दरासंदर्भात प्रदीर्घ चर्चा झाली.

व्यापारी आणि शेतकर्‍यांनी समन्वव्यातून सात रुपये अकरा पैसे दर निश्चित केला. पुढील बैठक होईपर्यंत या दराने पपईची तोडणी करावी असे आवाहन करण्यात आले.

यावेळी बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील पाटील, पपई उत्पादक समन्वय समितीचे भगवान पाटील, विश्वनाथ पाटील, दीपक पाटील, डॉ.उमेश पाटील, प्रफुल पाटील, राकेश गिरासे, दिनेश पाटील, संदीप माळी आदींसह शेतकरी उपस्थित होते.

व्यापारी प्रतिनिधी म्हणून नाजिम बागवान, फारुक बागवान, हाशिमभाई मुल्लाजी, इक्बाल बागवान, शहबाज पठाण, प्रकाश राजस्थानी, जोगाराम राजस्थानी, छोटेराम राजस्थानी आदींसह व्यापारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या