Thursday, May 2, 2024
Homeनगरकरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपाचे चार दक्षता पथके

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपाचे चार दक्षता पथके

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महानगरपालिकेच्या हद्दीत करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तो रोखण्यासाठी मनपाने चार दक्षता पथकांची नियुक्ती केली आहे.

- Advertisement -

सावर्जनिक ठिकांणी विनामास्क फिरणार्‍यांवर पथकाद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्राची पहाणी केली जाणार आहे.

यामध्ये प्रभाग 1 मध्ये परिमल निकम हे पथक प्रमुख तर प्रभाग दोन मध्ये शशिकांत नजन, प्रभाग 3 मध्ये उपायुक्त संतोष लांडगे, प्रभाग चार मध्ये कल्याण बल्लाळ हे पथक प्रमुख असणार आहेत. त्यांच्या बरोबर दोन मनपा व पोलीस कर्मचारी असणार आहेत. या पथकाकडून विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे.

तसेच 200 रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच पथकाकडून हॉटेल, मंगलकार्यालये, जिम, चौकाचौकातील गर्दीची ठिकाणांची पहाणी केली जाणार आहे. तसेच शहरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मनपा प्रशसनाने 10 ठिकांणी कन्टेंन्मेट झोन जाहीर केले आहेत.

सावेडीतील बालिकाश्रम रस्ता, सिव्हील हडको, तर कोहिनूर मंगल कार्यालय, केडगाव, सारसनगर, बोल्हेगाव परिसराचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन मनपा तर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या