Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू; सर्व कारभार राजभवनातून होणार

Share

नवी दिल्ली | प्रतिनिधी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून राज्यात कलम 356 लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती. दरम्यान, आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राष्ट्रपतींच्या शिफारशीवर स्वाक्षरी झाल्यानंतर राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले आहे. यापुढील राज्याचा कारभार राजभवनातून होणार आहे.

2014 मध्ये एक महिन्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळूनही या दोन घटकपक्षांमध्ये मतभेद झाले आणि सरकार स्थापन करण्यात युती अपयशी ठरली.

त्यानंतर गेले 3 दिवस वेगवान राजकीय घडामोडी घडल्या पण एकही पक्ष पुरेसे संख्याबळ दिलेल्या मुदतीत उभ करू शकला नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी काल रात्री सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केलं होते पण राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा मुदत वाढवून मागितल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस राज्यपालांनी केली.

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

भारताच्या राज्यघटनेत कलम 352 ते 360 ही आणीबाणीशी संबंधित आहेत. यामध्ये 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत. 1) राष्ट्रीय आणीबाणी, 2) आर्थिक आणीबाणी, 3) राष्ट्रपती राजवट.कलम 356 नुसार राज्यातील प्रशासन घटनेनुसार चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तरतूद आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!