राष्ट्रपती निवडणुकीसाठी मीराकुमार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज्

0

नवी दिल्ली, ता. २८- येत्या १७ जुलैला होत असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीचा उमेदवारी अर्ज कॉग्रेस आघाडीच्या उमेदवार मीराकुमार यांनी दाखल केला.

यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, यांच्यासह १७ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.

भाजपा आघाडीच्या रामनाथ कोविंद यांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला असून आज अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती.

आतापर्यंत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

*