राम नाथ कोविंद यांच्या मुळगांवी उत्सवी वातावरण

0

नवी दिल्ली, ता. २० : राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीची मतमोजणी सुरू झाली असून राम नाथ कोविंद यांचे पारडे जड मानले जात आहे.

परिणामी १४ वे राष्ट्रपती म्हणून कोविद यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांच्या मुळ गावी त्यांच्या वडिलोपार्जित घरात उत्सवी वातावरण असून रांगोळ्यांची सजावट करण्यात तेथील ग्रामस्थ व्यस्त आहेत.

कोविद राष्ट्रपती झाल्यास त्यांच्या विजयाचा आनंद ते अशा पद्धतीने साजरा करण्यासाठी सकाळपासूनच सज्ज झाले आहेत.

उत्तरप्रदेश मधील कानपूर जिल्ह्यातील परौंख, ता. डेरापूर हे राम नाथ कोविंद यांचे  मुळ गाव. त्यांचा जन्मही याच ठिकाणी झाला.

पुढे त्यांनी आपले वडिलोपार्जित घर गावासाठी दान केले. पुढे त्यात सुधारणा करून तेथे गावाचे मिलन केंद्र अर्थातच सार्वजनिक सभागृह म्हणून लग्नसमारंभ आदींसाठी वापर होतो.

LEAVE A REPLY

*