Type to search

शैक्षणिक

सामान्यज्ञान विषयाची तयारी करताना

Share

स्पर्धात्मक परीक्षेत उतरणार्‍या बहुतांशी विद्यार्थ्यांना करंट अफेअर्स म्हणजे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी विषय आव्हानात्मक वाटतो. वास्तविकपणे हा विषय सर्वाधिक स्कोरिंग करणारा आहे. मॅथ्स आणि रीजनिंगप्रमाणे हा विषय वेळखावू नाही. अशा स्थितीत जो उमेदवार नॅशनल आणि इंटरनॅशनल इव्हेंटसच्या माध्यमातून स्वत:ला अपडेट ठेवतो, त्यांना या विषयाचे कोणतेच भय वाटत नाही. करंट अफेअर्सच्या तयारीसाठी काही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावे लागते. करंट अफेअर्स सेक्शन हा काही उमेदवारांना सर्वाधिक अनप्रेडिक्टेबल सेक्शन वाटतो. कारण याचा अभ्यासक्रम खूपच व्यापक आहे. मात्र या विषयाला सर्वाधिक स्कोरिंग विषयाच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. कारण योग्य रितीने तयारी करणार्‍या उमेदवाराला यात चांगले गुण मिळण्याची अधिक शक्यता असते.

करंट अफेअर्स भूमिका केवळ लेखी परीक्षा संपेपर्यतच राहत नाही तर मुलाखतीतूनही सहीसलामत बाहेर पडण्यासाठीदेखील सामान ज्ञान आणि चालू घडामोडींचा विषय महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे या विषयाची संपूर्ण तयारीसाठी रणनिती असणे खूप आवश्यक आहे. बँकिंग, नागरी सेवा, लष्करी सेवा, नीट सारख्या बुद्धिमत्तेची कस लावणार्‍या परीक्षेत सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीविषयक प्रश्‍नांचा समावेश असतोच. परीक्षेच्या स्वरुपानुसार करंट अफेअर्सचे स्वरुप बदल असते.

बँकिंगची परीक्षा असेल तर अर्थकारणावर आधारलेल्या प्रश्‍नांचा समावेश असतो तर नागरी सेवेच्या परीक्षेत शासन निर्णयाची माहिती विचारणारे प्रश्‍न असतात.तार्किक प्रश्‍नांबरोबरच करंट अफेअर्सचे प्रश्‍नदेखील उमेदवारांला भंडावून सोडतात. बहुतांशी उमेदवार हे पहिलीपासून ते बारावी पर्यंतचे पुस्तके संदर्भासाठी हाताळतात. कारण स्पर्धात्मक परीक्षेत कधी कधी अत्यंत बेसिक प्रश्‍न विचारतात की, तो आपल्या आठवूनही लिहता येत नाही. म्हणूनच तज्ञांनी करंट अफेअर्सच्या तयारीसाठी काही गोष्टी येथे नमूद केल्या आहेत.

सुरवातीपासूनच तयारी करा : करंट अफेअर्स हा विषय एखाद्या विशिष्ट मुद्द्याभोवती आधारलेला विषय नाही तसेच यात समाविष्ट असणार्‍या घटनांना देखील मर्यादा नाही. या विषयाचा विस्तार प्रचंड आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांनी या विषयाची तयारी अगोदरपासूनच करायला हवी. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सहा ते सात महिन्यांच्या कालावधीतील आधारलेले इव्हेंटवर प्रश्‍न विचारले जातात. त्यामुळे काही महिने अगोदरपासूनच तयारी केली तर परीक्षेअगोदर केवळ उजळणी करणे पुरेसे आहे. जगात आणि देशात घडणार्‍या असंख्य घडामोडींचा यात समावेश असतो. परीक्षेत कोणत्या मुद्द्यावर प्रश्‍न विचारले जातील, हे सांगणे कठीण आहे. इतिहासाबरोबरच चालू घडामोडीकडे देखील चौकसरितीने पाहवे लागते.

डायरी तयार करा: लिखाण हा करंट अफेअर्सचा सर्वात प्रभावशाली उपाय मानला स्पर्धात्मक परीक्षेत उतरणार्‍या बहुतांशी विद्यार्थ्यांना करंट अफेअर्स म्हणजे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी विषय आव्हानात्मक वाटतो. याचे कारण करंट अफेअर्स हा विषय एखाद्या विशिष्ट मुद्द्याभोवती आधारलेला विषय नाही तसेच यात समाविष्ट असणार्‍या घटनांना देखील मर्यादा नाही. या विषयाचा विस्तार प्रचंड आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांनी या विषयाची तयारी अगोदरपासूनच करायला हवी

उमदेवारांनी दैनंदिन घडणार्‍या घटनांची नोंद डायरीत करायला हवी. एखाद्या व्याख्यानाला किंवा कार्यशाळेत सहभागी झाल्यास तेथील तज्ञांने दिलेली दुर्मिळ माहिती डायरीत नोंदवून ठेवल्यास त्याचा उल्लेख मुलाखतीच्या वेळी संदर्भासाठी करता येतो. त्याचबरोबर एखाद्या घटनेची पार्श्‍वभूमी समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उमेदवार आपल्या डायरीत महत्त्वांच्या संस्थांचे देखील विवरण लिहू शकतो. जागतिक पातळीवर काम करणार्‍या शासकीय आणि निमशासकीय संस्थांबद्धल माहिती गोळा करून एकत्र करणे हे देखील करंट अफेअर्ससाठी महत्त्वाचे मानले जाते.

वृत्तपत्राचे वाचन: नियमित वृत्तपत्र वाचन हा करंट अफेअर्सचा आत्मा समजला जातो. वृत्तपत्राशिवाय करंट अफेअर्सची तयारी अशक्यच आहे. अर्थात वृत्तपत्रात काय वाचन करावे, हे देखील निश्‍चित करता आले पाहिजे. सर्वसाधारणपणे उमेदवाराला वृत्तपत्रातील राष्ट्रीय बातम्या, आंतरराष्ट्रीय बातम्या, क्रीडा, संपादकीय पानांचे नियमित वाचन करायला हवे. प्रांतिक भाषेबरोबरच हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्राचे देखील वाचन करायला हवे. प्रत्येक वृत्तपत्राची भूमिका आणि माहिती वेगळी असते. या भूमिकेचे सार आपल्याला करंट अफेअर्समध्ये मांडावे लागते. विविध वृत्तपत्रांचे नियमित वाचन केल्यास करंट अफेअसर्च पाया निश्‍चितच मजबूत होतो. इंग्रजी वृतमानपत्र राष्ट्रीयबराबरोबरच आंतराष्ट्रीय बातम्यांचे सखोल वार्ताकन करत असतात. स्थानिक वृत्तपत्रात त्याचे संदर्भ मिळतीलच याची खात्री देता येत नाही.परदेशातील एखाद्या घटनांचे सविस्तर विवरण आपल्याला अशा वृत्तपत्रातून मिळू शकते आणि त्याचे आपण टिपण करून ठेवू शकतो.

मॉक टेस्ट द्या: मॉक टेस्ट ही स्वत:ला ओळखण्याचा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. जर उमेदवारांना या परीक्षेत सहभागी व्हायचे असेल तर त्याने कमीत कमी एक महिना अगोदर तयारी करणे गरजेचे आहे. परीक्षा देताना वेळेचे बंधन पाळणे गरजेचे आहे. जेणेकरून परीक्षेत त्याचा फायदा मिळू शकेल. मॉक टेस्टमध्ये आपण जे चुकीच्या पद्धतीने प्रश्‍न सोडवले असतील, त्या प्रश्‍नाचे अचूक उत्तर आपल्या डायरीत नोंदवून ठेवावे. तसेच उत्तराची उजळणी करावी, जेणेकरून परीक्षेत पुन्हा चूक होणार नाही.

इंटरनेटचा उपयोग: इंटरनेटवर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींविषयक इंत्यभूत माहिती देणार्‍या साइटस आहेत की ज्या एसएससी किंवा बँक परीक्षेसाठी करंट अफेअर्ससंबंधी मटेरियल उपलब्ध करून देते. ज्या उमेदवारांना तयारी करताना अडचणी येतात, ते इंटरनेटच्या साधनांचा वापर करू शकतात. इंटरनेटच्या मदतीतून तयारी करण्याचा एक फायदा असा की, आपण एखाद्या विशिष्ट मुद्द्याची तयारी करत असताना त्यासंबंधी असलेल्या दुसर्‍या मुद्द्याची तयारी देखील तात्काळ करू शकता. याशिवाय विविध तज्ञांचे ब्लॉग देखील आपल्याला स्पर्धात्मक परीक्षेसाठी साह्यभूत ठरू शकते.

यूपीएसएसी : इंडियन कॉन्स्टिट्यूटशन, इंडियन पीनल कोड, हिस्ट्री, इंडियन पॉलिटीक्स, पार्लमेंट सेशन्स, एव्हरिडे सायन्स, इंडियन इकॉनॉमी, इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफी यासह महत्त्वाच्या घडामोडी. यूपीएससी परीक्षेत आयएएस, आयपीएस, आयएफएस श्रेणीचा समावेश असतो. देशाबरोबरच परदेशात घडणार्‍या घडामोडींचे बारकाईने अध्ययन करावे लागते. उदा. अलिकडेच पार पडलेल्या अमेरिका अध्यक्ष निवडणूक, ब्रेक्झिट, यूरोपचे बदलते अर्थकारण, डोकलाम मुद्यावरून भारत-चीनमध्ये वाढलेला तणाव, पर्यावरणविषयक पॅरिस करार आदीसारखे विषयांचा समावेश होतो.

एमपीएससी: बँकिंग आणि यूपीएससी परीक्षेप्रमाणेच एमपीएससी परीक्षेतही करंट अफेअर्सच्या विषयाची तयारी करावी लागते. याशिवाय राज्यविषयक असलेल्या सामान्य ज्ञानाचे देखील अवलोकन करावे लागते. राज्यातील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्रीडाविषयक, शैक्षणिक विषयक घडामोडींचे अध्ययन विद्यार्थ्याला करावे लागते. राज्याचा इतिहास, भूगोलविषयक माहितीची तयारी देखील प्राथमिक पातळीपासून करावी लागते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!