Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

राष्ट्रवादीने असमर्थता दर्शिवल्यास राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता

Share

मुंबई | प्रतिनिधी 

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपने सत्ता स्थापणेसाठी असमर्थता दर्शिवल्यानंतर काल शिवसेनेला कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र मिळू शकले नाही. त्यामुळे सेनेला रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. दरम्यान, राज्यपालांनी आज राष्ट्रवादीला रात्री आठ वाजेपर्यंत वेळ दिली आहे, यामध्ये राष्ट्रवादीने सत्ता स्थापन करण्यासाठी असमर्थता दाखविल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दाट शक्यता आहे.

राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी काही कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतात. या बाबींसाठीची तयारी राजभवनाकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आज सत्ता स्थापणेचा दावा करण्यासाठी काय खेळी रचते याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, काल शिवसेनेला पाठींबा देण्यावरून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकमेकांकडे बोट दाखवले आहेत. ठोस पाठींब्यासाठी कुठल्याही नेत्याने स्पष्टीकरण दिलेले नाही. सर्व पक्षांनी सरकार स्थापन करण्यास नकार दिला तर राज्याची सत्ता अधांतरीत राहण्याची शक्यता आहे. राज्यपाल राज्यात राष्ट्रपतींना अहवाल पाठवून अनुच्छेद ३५६ नुसार राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात.

जर काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला तर राष्ट्रवादीच्या मदतीने उद्धव ठाकरे राज्यपालांकडे बहुमताचा दावा करू शकतात. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेना सरकार स्थापन करू शकेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!