’प्रेम रतन धन पायो’मध्ये दिसणार होती ही अभिनेत्री

0

मुंबई- प्रेम रतन धन पायो हा सलमान खानचा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात प्रेक्षकांना सोनम कपूर आणि सलमान खानची जोडी पाहायला मिळाली होती. पण या चित्रपटात सोनमच्या आधी एका वेगळ्याच अभिनेत्रीचा विचार करण्यात आला होता. सलमान खानने या चित्रपटात डबल रोल साकारला होता. या चित्रपटातील सलमानच्या अभिनयाचे कौतुक सगळ्यांनी केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई देखील चांगली केली होती. या चित्रपटात सलमान आणि सोनमसोबतच नील नितीन मुकेश, अनुपम खेर, स्वरा भास्कर, अरमान कोहली यांच्या मुख्य भूमिका होत्या. सलमानने प्रेम रतन धन पायो या चित्रपटाच्या निमित्ताने राजश्री प्रोडक्शनसोबत अनेक वर्षांनी काम केले होते.

त्यामुळे या चित्रपटात कोणतीही कमतरता येऊ नये यासाठी संपूर्ण प्रोडक्शन हाऊस प्रयत्न करत होते. सलमान आणि दीपिका पादुकोण हे बॉलिवूडमधील दोन्ही मोठे स्टार असले तरी त्यांनी कधीच एकमेकांसोबत काम केले नाही. त्यामुळे प्रेम रतन धन पायो या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका आणि सलमानची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार होती. या चित्रपटासाठी दीपिकाला विचारण्यात देखील आले होते. पण काही कारणांमुळे तिने या चित्रपटाला नकार दिला आणि या चित्रपटात सोनम कपूरची वर्णी लागली.

LEAVE A REPLY

*