Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

येत्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

Share

एप्रिल, मे महिन्यात कडक उन्हाने घामाघूम झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत पूर्व मोसमी पावसाची वादळी वा-यासह हजेरी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नाशिकसह परिसरात आकाश निरभ्र असले तरी तापमानात काहीशी घट झालेली बघायला मिळत आहे. नाशिकचे तापमान गेल्या आठवड्यापासून ३७ ते ३९ अंशांच्या पातळीत आहे.

तर गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानातही काहीशी घट होतांना दिसून येत आहे. मुंबई शहरात ढगाळ वातावरण असून पावसाच्या हलक्या सरी बरसणार अशी शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, सह कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यातील अन्य भागातही वादळी वा-यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!