बाहेरगावी जाताय; पोलिसांचा हा सल्ला जरूर अमलात आणा

0

नाशिक, ता. १० : उन्हाळ्यात घरफोडीचे प्रकार वाढतात. अशावेळी बाहेरगावी किंवा लग्नसमारंभाला जाताना काही दक्षता घेतली, तर नक्कीच उपयोग होईल.

नाशिक पोलिसांनी नागरिकांना त्यासाठी पुढील दक्षतेचे आवाहन केले आहे.

 • एप्रिल-मे-जूनमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बेरोजगारीमुळे चोऱ्यामध्ये वाढ होते.
 • शक्य असेल तर घरात सायरन, CCTV लावावा आणि त्याचा DVR/NVR सुरक्षीत जागेत (लपवुन) ठेवावा. कधी कधी चोरटे DVR घेवून जातात. शक्य असेल तर सुरक्षा रक्षक नेमावा.
 • गरजेपेक्षा जास्त सोने, नाणे, दागिने सुरक्षितपणे बँकेत लॉकर मध्ये ठेवावे.
 • बाहेरगावी जाताना सोने-नाणे दागिने विश्वासू शेजारी किंवा नातेवाईक यांचेकडे ठेवावे.
 • रोकड ऐवजी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक व्यवहार पद्धतीचा अवलंब करावा.
 • बाहेर गावी जाताना घरामध्ये सोने, नाणे दागिने ठेवू नये.
 • चोरा सारख्या संशयित हालचाली किंवा असतील तर स्थानिक पोलिसांना तात्काळ कळवावे.
 • बाहेर जाताना मुख्य दरवाजाची कडी व कुलूप जाऊ नये. घर बंद करून जाताना लॅच प्रकारातील कुलपाचा वापर करावा. (घरामध्ये कोणी आहे किंवा नाही याचा चोरास याचा अंदाज घेता येत नाही.)
 • रात्रीच्या वेळी बाहेर गावी जाणार असाल तर घरा मधील लाईट चालू ठेवावी. ( घरामध्ये कोणी आहे किंवा नाही याचा चोरास याचा अंदाज घेता येत नाही.)
 • उन्हाळ्याचे दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी घरे उघडी ठेवून झोपू नका.
 • लग्न समारंभासारख्या कार्यक्रमास जाताना दागिन्यांचे जाहीर प्रदर्शन करून नये. तुमचे दागिने हिसका मारून पळुन नेले जावू शकतात.
 • काहीही कामधंदा करीत नसलेली तरुण मुले, व्यक्ती पॉश रहात असतील तर अशा लोकांवर लक्ष ठेवून पोलिसांना माहिती द्यावी.
 • रात्रीच्या वेळी संशयीत हालचाली वाटल्यास तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशनला फोनद्वारे कळवावे, त्याकड़े दुर्लक्ष करू नये.
 • 15 एवढी काळजी घेऊनही देखील चोरी झालीच, तर काचेसारख्या वस्तूंवर चोरांचे ठसे उमटत असतात. त्यांना, तसेच चोरांच्या इतर वस्तूस स्पर्श न करता स्थानिक पोलिसांना तात्काळ कळवावे.

LEAVE A REPLY

*