Pre GST Effect : 60 हजार रुपयांचा ‘आयफोन 7’ 40 हजार रुपयांत

0

देशात 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे, मात्र त्याचा परिणाम आत्ताच जाणवू लागला आहे. कारण जवळपास सर्वच कंपन्यांनी वस्तूंवर भरघोस सूट दिली आहे.

प्री-जीएसटी सेलमध्ये 60 हजार रुपयांचा आयफोन 7 -40 हजार रुपयांमध्ये मिळतोय.

एचपीचा 85 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप 65 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

कॅनॉनचा 5 डी कॅमेरा, ज्याची किंमत जवळपास सव्वा तीन लाख रुपये आहे, तो जीएसटी लागू होण्यापूर्वी 2 लाख 65 हजार रुपयांमध्ये मिळतोय.

तर एक लाख रुपये किंमतीचा एलईडी टीव्ही 50 टक्के डिस्काऊंटसह 50 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

बजाजने दुचाकींवर 4 हजार 500 रुपयांची सूट दिली आहे. तर ऑडीनेही अगोदरच सूट देत असल्याची घोषणा केली आहे. कार कंपन्या अडीच लाखांपर्यंत सूट देत आहेत. तर रीबॉक, वुडलँडसारख्या कंपन्याही उत्पादनांवर भरघोस सूट देत आहेत.

LEAVE A REPLY

*