Thursday, May 2, 2024
Homeराजकीयप्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला ; 15 दिवसांत तीनदा भेट

प्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला ; 15 दिवसांत तीनदा भेट

नवी दिल्ली – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रमंचच्या नेत्यांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीनंतर आज पुन्हा प्रशांत किशोर हे पवारांच्या भेटीसाठी गेल्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईतील निवासस्थानी प्रशांत किशोर यांनी पवारांची भेट घेतली होती. ही भेट नेमकी कशासाठी होती, हे अखेरपर्यंत कळू शकलं नाही. प्रशांत किशोर हे आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती ठरविणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, किशोर यांनी ती चर्चा खोडून काढली होती. त्यातच मंगळवारी पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी देशातील 15 नेत्यांची बैठक झाली. यात देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं समजतं. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर प्रशांत किशोर हे पुन्हा एकदा पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातील गेल्या 48 तासांतील ही दुसरी भेट असून 15 दिवसांतील तिसरी भेट आहे त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

भारतात करोना रुग्ण संख्येने ओलांडला तीन कोटींचा टप्पा

विरोधी पक्षांची बैठक तिसर्‍या आघाडीसाठी नव्हती

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रमंचच्या नेत्यांची मंगळवारी बैठक झाली. ही बैठक देशातील तिसर्‍या आघाडीबाबत असल्याचे बोलले जात होते. परंतु ही बैठक देशातील तिसर्‍या आघाडी आणि मोदींविरोधात नसल्याचे राष्ट्रमंचच्या नेत्यांनी सांगितले आहे. तसेच ही बैठक शरद पवार यांनी आयोजित केली नव्हती अशीही माहिती या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. या बैठकीला काँग्रेसच्या खासदारांनाही आमंत्रित करण्यात आले होते यामुळे परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही परंतु या बैठकीत देशातील राजकीय घडामोडी आणि वातावरण याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या