केंद्रीय मंत्री जावडेकर आज नाशकात

0

नाशिक : केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर उद्या मंगळवारी नाशिक दौर्‍यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जावडेकर यांचे सकाळी 8.15 वाजता पुण्याहून विमानाने ओझर विमानतळावर आगमन होईल. नंतर सकाळी 9 वाजता कारने ते नाशिकरोड येथे रवाना होतील. त्यांच्या उपस्थितीत प्रभाग 18 मध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

सकाळी 11 वाजता अंबड येथील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे यशस्वी व्यावसायिकांशी ते संवाद साधतील. दुपारी 1 ते 2 वाजेदरम्यान नाशिकरोड येथील नगरसेवक प्रा. शरद मोरे यांच्या निवासस्थानी त्यांचा कार्यक्रम राखीव आहे.

दुपारी 3 वाजता. महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून जावडेकर यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. सायंकाळी 5.30 वाजता गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुल येथील कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते मुंबईकडे प्रयाण करतील.

LEAVE A REPLY

*