नवीन चित्रपटात प्राजक्ता दिसणार ‘बोल्ड लूक’ मध्ये! ‘सार्वमत डिजिटल’शी खास बातचीत

0

नुकतेच प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत आपल्याला तिच्यासोबत ललित प्रभाकर आणि प्रकाश कुंटे दिसत आहेत. प्रकाश कुंटे यांनी कॉफी आणि बरेच काही, & जरा हटके यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

तिने या फोटोसोबत पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी माझ्या आगामी चित्रपटासाठी नुकतेच डबिंग केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केले आहे. फोटोत तुम्हाला ते गोड हसताना दिसत आहेत तेच प्रकाश आहेत. मी त्यांना ज्युनिअर इम्तियाज अली अशी हाक मारते. मी आजवरच्या माझ्या करियरमधील सर्वात चांगले डबिंग केले असून ते केवळ प्रकाश यांच्यामुळे शक्य झाले. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि माझ्यातील गुणांना वाव दिल्याबद्दल धन्यवाद…

चित्रपटाविषयी प्राजक्ताने  ‘सार्वमत डिजिटल’शी बोलताना सांगितले ,’मी या चित्रपटामध्ये बोल्ड लुक मध्ये दिसणार आहे, माझ्या सोबत या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि ललित प्रभाकर आहेत , संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण कर्नाटकातील ‘हम्पी’ मध्ये झाले आहे, डबिंग पूर्ण झाले असून येत्या ऑक्टोबर किवा नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल, आम्हाला हम्पीमध्ये शुटींग करताना खूप धमाल आली, प्रेक्षकांना चित्रपट नक्की आवडेल, असा मला विश्वास आहे. चित्रपटाचे टायटल अजून निश्चित नाहीये, लवकरच चित्रपटाविषयी अधिक माहिती , लुक , रिलीज डेट कळवण्यात येणार आहे’      

LEAVE A REPLY

*