Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव शैक्षणिक

अमळनेर : राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत मेघ गोहिल राज्यात चौथा

Share

अमळनेर (प्रतिनिधी)

येथील मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री एन.टी.मुंदडा ग्लोबल स्कुलचा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एन.सी.ई.आर.टी. यांचे मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असुन त्यात मुंदडा ग्लोबल स्कुलचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी मेघ हितेशकुमार गोहिल हा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे.

त्याला केंद्र शासनाची दरमहा रू.१२५० शिष्यवृत्ती मिळणार आहे. मेघ हा राज्यात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. सदर विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा, चेअरपर्सन सौ.छायाभाभी मुंदडा, सहसचिव योगेश मुंदडा, सचिव अमेय मुंदडा, सौ.दिपीका मुंदडा, नरेंद्र मुंदडा, राकेश मुंदडा, पंकज मुंदडा, सर्व पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य लक्ष्मण सर, प्रायमरी प्राचार्या सौ.विद्या मॅडम, प्रायमरी को-ऑडीनेटर सौ.योजना ठक्कर, सर्व शिक्षिक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!