Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedधुळे : अपघातामुळे 15 गावातील वीज पुरवठा खंडित

धुळे : अपघातामुळे 15 गावातील वीज पुरवठा खंडित

उच्च दाबाच्या वीज वाहिनीला आगीचा फटका

धुळे –

धुळ्यापासून जवळ असलेल्या मुकटी गाव नजीक कासविहिर येथे झालेल्या अपघाताचा फटका परिसरातील 15 ते 20 गावांना बसला आहे.

- Advertisement -

लक्झरी बस आणि गॅस टॅंकर यांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोन्ही वाहनांनी पेट घेत, त्यांचा स्फोट झाल्याने आगीचे लोळ उठले.

त्याच ठिकाणाहून उच्च दाबाची वीज वहिनी गेली आहे. आगीमुळे या वहिनीच्या तारा ही जळाल्या. परिणामी परिसरातील 15 ते 20 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

सायंकाळी या ठिकाणी वीज कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आले असून दुरुस्तीचे काम सुरू झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या