Thursday, May 2, 2024
Homeनाशिकमृत्यूला निमंत्रण देणारा खड्डा... संबंधित विभागाचे दुर्लक्ष

मृत्यूला निमंत्रण देणारा खड्डा… संबंधित विभागाचे दुर्लक्ष

ओझे l Ojhe (वार्ताहर)

दिंडोरी तालुक्यातील काही भागातील रस्त्याचे आजार पण प्रवासी वर्गासाठी नेहमी डोकेदुखी ठरली आहे. त्यामध्ये अक्राळे ते जानोरी रस्ता सध्या खड्ड्याच्या आजाराने बेजार झाला आहे.

- Advertisement -

अक्राळे ते जानोरी हा रस्ता दिंडोरी तालुक्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. या रस्त्याने अक्राळे, अंबे, जानोरी, १०वा मैल, मोहाडी, एच.ए.एल.ओझर मिग इ. महत्त्वाच्या गावाला जोडणारा हा रस्ता सध्या वाईट मार्गातून मार्गक्रमण करीत आहे.

तसेच या रस्त्यावरील खड्डे टाळतांना अनेक गाड्या समोरा समोर येऊन छोटे मोठे अपघात झालेले आहे. त्यामध्ये अनेकांना कायमचे अपंगत्व आले तर काहीनां आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करतांना आपण सुख रूप घरी जाऊ यांची शाश्वतीच राहिली नाही.

त्यात या रस्त्यावर एक ठिकाण असे आहे की ते ठिकाण म्हणजे गायकवाड वस्तीच्या पुढे व हाॅटेल सोनल च्या समोर मुख्य रस्त्याच्या कडेला पाण्याच्या जास्त प्रवाहामुळे रस्ता खचला असून तो खड्डा नेमका वळणाच्या ठिकाणी असल्यामुळे या रस्त्याने राञी बेराञी प्रवास करणा-या प्रवासी वर्गासाठी जणू काही मुत्यूचे आमंत्रणच देत आहे. त्यामुळे हा खड्डा या रस्त्याने प्रवास करणा-या प्रवासी वर्गासाठी मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे.

या रस्ता महत्त्वाचा मानला जातो असून त्याची अवस्था रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता हे समीकरण गुंतागुंतीचे होऊन बसले आहे. तेव्हा हा रस्ता जर अशाच स्थितीत राहिला तर किती नागरिकांचे प्राण जातील. हे सांगणे कठीण होऊन बसले.

तरी संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून या रस्त्याची दुरूस्ती तात्काळ करावी ही मागणी या रस्त्याने प्रवास करणा-या प्रवासी वर्गाने केली आहे.

मुख्य रस्त्यावर तसेच वळणावर हा खड्डा येत असल्याने राञी बेराञी या रस्त्याने कामगार, विद्यार्थी वर्ग, शेतमजुर, अनेक छोटे मोठे वाहने. हा रस्ता एम.आय.डी.सी.ला जोडणारा असल्यामुळे नेहमी वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याची संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देऊन दुरूस्ती करावा ही मागणी प्रवासी वर्गातून जोर धरीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या