Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक मध्यमध्ये पोस्टल मतमोजणीला प्रारंभ; थोड्याच वेळात कल हाती येण्यास सुरुवात

Share

नाशिक | प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज राज्यातल्या विविध मतदारसंघात पार पडत आहे. मतदान झाल्यानंतर कोणी देवपूजा केली, कोणी वाचनात दिवस काढला तर कोणी तीर्थयात्रेला गेले.

अखेर दोन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज मतमोजणीचा दिवस आला आहे. याठिकाणी मतमोजणी केंद्र परिसरात उमेदवारांसह कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली आहे.

नाशिक मध्यमध्ये पोस्टल बॅलेट मतमोजणीला सुरूवात झाली आहे. कुलाबा येथे पोस्टल मतमोजणीला नुकताच प्रारंभ झाला आहे. इतर शहरातही पोस्टल मतमोजणी सुरु होणार असून लवकरच कल हाती येणार आहेत. पहिल्या एका तासांत आघाडी आणि युतीतील उमेदवारांचा कल समजून येणार आहे.

यावर्षी मतदानाचा टक्का यावर्षी घटल्याने हा घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडेल या पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जिल्हयातील 15 विधानसभा मतदार संघाची मतमोजणीचे ठिकाण संबंधित विधानसभा मतदारसंघामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार निश्चित करण्यात आलेली आहे.

मतमोजणी केंद्रावर सुरक्षा व्यवस्था, पार्कींग व्यवस्था, गर्दी व्यवस्थापन, सी.सी.टी.व्ही.सह सर्व व्यवस्था उपलब्ध करण्यात आली असून २४ तास याठिकाणी केंद्रीय पोलीस दलाचा पहारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ क्रमांक.व नाव मतमोजणी केंद्राची माहिती

113- नांदगाव इतर शासकीय नविन इमारत कार्यालय, नांदगाव तहसिल कार्यालय

114- मालेगांव मध्य शिवाजी जिमखाना, श्रीरामनगर, संगमेश्वर, मालेगांव

115- मालेगांव बाहय महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोडावून, कॅम्परोड, मालेगांव

116- बागलाण नविन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, बागलाण आवार, सटाणा

117- कळवण पंचायत समिती सभागृह, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कळवण

118- चांदवड नविन प्रशासकीय इमारत, मनमाड रोड, चांदवड

119- येवला औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाभूळगांव बु.

120- सिन्नर तहसिल कार्यालय, सिन्नर

121- निफाड कर्मवीर गणपतराव मोरे संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, निफाड

122- दिंडोरी म.वि.प्र. संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, उमराळे रोड, दिंडोरी

123- नाशिक पूर्व विभागीय क्रिडा संकुल, नवीन आडगांव नाका, नाशिक

124- नाशिक मध्य मनपाचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, नाशिक

125- नाशिक पश्चिम छत्रपती संभाजी स्टेडियम, अश्विन नगर, सिडको, नाशिक

126- देवळाली विभागीय कार्यालय, ना.रोड, महानगरपालिका, नाशिक

127- इगतपुरी शिवाजी स्टेडीयम, कन्या शाळेजवळ, सीबीएस, नाशिक.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!