Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

पोस्टाची ‘ही’ सुविधा देणार अॅमेझॉन फ्लिपकार्टला टक्कर

Share
मुंबई : ई- कॉमर्सच्या जगात अनेक वेगवेगळ्या संकेतस्थळांनी गर्दी केली आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येक कंपनीकडून प्रयत्न केले जात आहेत.

ई-कॉमर्स क्षेत्रात आता भारतीय पोस्ट ऑफिसनेही पाऊल ठेवले आहे. भारतीय पोस्टाने ई-कॉमर्स पोर्टल लाँच केले असून या पोस्टाच्या पोर्टलवरून ग्राहकांना अत्यंत कमी किमतीत चांगल्या वस्तू विकत घेता येणार आहेत.

पोस्टल बँकनंतर आता पोस्टाने ई-कॉमर्स क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसारख्या कंपन्यांना कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे.

इंडियन पोस्टाच्या या पोर्टलची एक खासियत आहे. देशातल्या गावागावात पोस्टमन काका जात असल्यामुळे आपण एखाद्या खेड्यातून मागवलेली वस्तूही घरपोच दिली जाणार आहे.

त्यामुळे पोस्टाच्या पोर्टलचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून येणाऱ्या काळात रोजगार वाढणार आहे. दूरसंचार आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्या हस्ते या पोर्टलचं लाँचिंग करण्यात आले आहे.

या ई-कॉमर्स पोर्टलवर पोस्टातील सर्व उत्पादने मिळणार आहेत. या पोर्टलने पोस्ट ऑफिस डिजिटल बाजाराशी जोडला जाणार आहे. पोस्टाच्या पोर्टलवरून मिळणाऱ्या उत्पादनात कपडे, फॅशन व ज्वेलरी, आदिवासांनी तयार केलेली उत्पादने बॅग, गिफ्ट आयटम, बास्केट, जैविक उत्पादने, हँडलूम उत्पादने, दैनंदिन जीवनात उपयोगाला येणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे.

ऑनलाइन उघडता येणार पोस्टल बँक खाते : भारतीय पोस्ट ऑफिसने आता आपल्याला बँकिंग सेवाही उपलब्ध करून दिली आहे. या सेवा अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचाव्यात, त्यासाठी त्यांना ऑनलाइन केल्या आहेत. आता आपण आरडी, पीएफ योजनेशी संबंधित कामं घरी बसून करू शकता.

ग्राहकांसाठी महत्वाचे

  • ग्राहक आता इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून सर्व कामे करू शकतात.
  • यात 17 कोटी पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांना ऑनलाइन पैसे वळते करण्याची सुविधा मिळणार आहे.
  • तसेच ग्राहक ऑनलाइन देवाण-घेवाणीचे व्यवहारही करू शकणार आहेत.
  • इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून आपण RD, TD, पीपीएफखाती उघडू शकतो.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!