Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

राष्ट्रवादीने वेळ वाढवून मागितला; राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीसाठी शिफारस, सेनेकडून याचिका

Share

file photo 

मुंबई | प्रतिनिधी 

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नाहीये. भाजपने सत्ता स्थापणेसाठी असमर्थता दर्शिवल्यानंतर शिवसेनेलाही बहुमत सिद्ध करता आले नाही. आज राष्ट्रवादीने पुन्हा वेळ वाढवून मागितल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत शिफारस करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र मिळू न शकल्याने शिवसेनेला शकले नाही. त्यामुळे सेनेला रिकाम्या हाताने परतावे लागले. दरम्यान, राज्यपालांनी आज राष्ट्रवादीला रात्री आठ वाजेपर्यंत वेळ दिली आहे. राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापन करण्यासाठी वेळ वाढवून मिळावा अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली, यानंतर कॉंग्रेस राष्ट्रवादीचे अद्याप तळ्यात मळ्यात असल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी याबाबत शिफारस राज्यपालांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी काही कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतात. या बाबींसाठीची तयारी राजभवनाकडून केली जात असल्याची माहिती आज दुपारी सूत्रांकडून मिळाली होती. दरम्यान, शिवसेना नेते अनिल परब म्हणाले की, शिवसेनेने तीन दिवसांची मुदत वाढवून मागितली होती, मात्र राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत वाढवून दिली नाही.

यामुळे न्याय मिळविण्यासाठी सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका दाखल करण्यात येणार आहे. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल हे शिवसेनेची बाजू न्यायालयात मांडणार असल्याचे समजते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!