Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

७२ हजार पदांच्या भरतीसाठी पुढील आठवड्यात जाहिरातीची शक्यता

Share

मुंबई । राज्य शासनाच्या ७२ हजार पदांच्या भरतीसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघण्याची शक्यता वर्तविण्यात अली आहे. राज्य शासनातर्फे कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांची क्षेत्रियस्तरावरील सुमारे ७२ हजार पदे भरण्यासाठी मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठका आयोजित केल्या जात आहेत. या मेगा भरतीची जाहिरात पुढील आठवड्यात निघण्याची शक्यता असून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरती परिक्षा घेतली जाणार असल्याचे समजते.

अर्थसंकल्पिय अधिवेशनात राज्यात ७२ हजार पदांसाठी मेगा भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, या भरतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आल्यानंतर ही भरती पुढे ढकलण्यात आली होती. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या भरतीकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असलेल्या सचिव गटामध्ये सामान्य प्रशासन, आरोग्य, ग्रामविकास, माहिती तंत्रज्ञान, महसूल, पाणी पुरवठा, वने या विभागाचे सचिव सदस्य आहेत. मुख्य सचिवांमार्फत दररोज पदभरतीच्या प्रक्रियेबाबत आढावा घेतला जात असल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!