मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता

0

पुणे (प्रतिनिधी) – अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळामुळे सध्या केरळ, तामिळनाडू येथे वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडत असून, तेथून राज्याच्या दिशेने अतिउष्ण व आर्द्रतायुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे अंदमान-निकोबारलगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

परिणामी राज्यात पुढील दोन ते तीन दिवस कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. चक्रीवादळामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍याचा

महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात किंचित वाढ झाली. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी बुधवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यकता आहे. पुण्यातही बुधवारपर्यंत (ता. 6) आकाश अंशतः ढगाळ, तर काही भागात हलक्यान स्वरूपाचा पाऊस होईल, अशी शक्यधता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

भंडारदर्‍यात रिपरिप –
ओखी चक्रीवादळामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात वातावरण बदलल्याचे दिसून आले. काही भागात ढगाळ हवामान होते. तर भंडारदरा पाणलोटात काल रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास 10 ते 15 मिनिटे रिपरिप पाऊस झाला. त्यामुळे परिसरात गारठा निर्माण झाला आहे, अशी माहिती भंडारदरा वार्ताहराने कळविली आहे.  

LEAVE A REPLY

*