त्र्यंबकेश्वरात आज दुसऱ्या श्रावण सोमवारी गर्दी वाढणार

0
त्र्यंबकेश्वर | येथे आज श्रावण सोमवारनिमित्त भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होनार आहे. पावसाला उतार पडला आहे. गत आठवडयात जोरदार पाऊस होत असल्याने आणि पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भाविकांची संख्या कमी झाली होती.

परंतु शनिवार पासूनच पाऊस कमी  झाला आहे. रविवारी सकाळपासून उन पावसाचा खेळसुरू होता, या उत्साही वातावरणात भाविकांची संख्या वाढेल असे दिसून येत आहे.तिसरा सोमवारची गर्दी टाळण्यासाठी बहुतांश भाविक याच सोमवारी प्रदक्षिणा करिता येतील असे रविवारी सायंकाळी शहरात दाखल झालेले भाविक पाहता जाणवते.

दरम्यान, मंदिर ट्रस्टने पुर्वदरवाजा दर्शनबारी पेंडाल पुर्ण केला असून रविवारपासून भाविकांना खुला करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने बंदोबस्तात वाढ केली असून जादा पोलीसबळ तैनात केले आहे.

ञ्यंबक नगर परिषद नगराध्यक्षा तृप्ती धारणे यांनी भाविकांची आरोग्य पाणीस्वच्छता दिवाबत्ती आदी सुविधा भाविकांना मिळाव्यात याकरिता प्रशासनास सुचना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

*