Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

१९ तारखेला वाजणार महाराष्ट्रासह तीन राज्याच्या निवडणुकांचा बिगूल?

Share

मुंबई | प्रतिनिधी 

शिवसेना-भाजप युतीची घोषणा १९ सप्टेंबरला नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोपा दरम्यान होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रासह हरयाणा, झारखंड या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा १९ सप्टेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा, आयुक्त अशोक लवासा आणि सुशीलचंद्र मुंबईत  आले आणि आयोगाच्या वतीने सलग दोन दिवस बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने माहिती आणि आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग या विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राजकीय पक्षांसमवेत बैठक  झाल्यानंतर विभागीय आयुक्त, जिल्हा निवडणूक अधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक,पोलीस अधीक्षक यांच्यासमवेत बैठक झाली अशी माहिती नंतर पत्रकार परिषदेत देण्यात आली. निवडणूक खर्च देखरेखविषयक विभागांसोबत बैठक, राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, गृह विभागाचे प्रधान सचिव आणि राज्य शासनाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक  झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

दौऱ्यामध्ये वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा आणि संदीप सक्सेना, उप निवडणूक आयुक्त सुदीप जैन आणि चंद्र भूषण कुमार,महासंचालक धिरेंद्र ओझा, संचालक (वित्त) विक्रम बात्रा, पीआयबीच्या अतिरिक्त महासंचालक शेफाली शरण, सचिव ए. एन. दास आणि अवर सचिव आय. सी. गोयल आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

यावेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. राज्य विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होतोय, याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.

आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आणि अन्य दोन आयुक्त मुंबईत येऊन दोन दिवस संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीची माहिती घेणार आहेत. गृहविभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांचीही बैठक घेऊन निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाईल याबाबतचा आढावा घेतला जाईल.

सूत्रांच्या माहितीनुसार, हरयाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना सर्वात आधी जाहीर होईल. तर झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी अनेक टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम २० सप्टेंबर रोजी जाहीर झाला होता. तर १५ ऑक्टोबरला मतदान झाले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!