नाशिक जिल्हयात पीओएस मशिन बंद; रेशन दुकानदारांची कैफियत

0
नाशिक । जिल्ह्यात धान्य वाटपासाठी रेशन दूकांनांमध्ये बसविण्यात आलेली पीओएस मशिन्स् (पाईंन्ट ऑफ सेल) सदोष असल्याने डेटा एन्ट्री करताना दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामूळे जिल्हयातील अडीचशेहून अधिक मशिन बंद असल्याची कैफियत रेशन दुकानदार संघटनेने पुरवठा मंत्र्यासमोर मांडली.

जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेतर्फे शुक्रवारी (दि. 10) नाशिक दौरयावर आलेल्या यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पीओएस पुरविणार्या कंपनीने मंत्रालयात दिलेल्या डेमोवेळीचे तसेच प्रत्यक्षात दिलेले मशिन्स् यात तफावत आहे. त्यातच डेटा एन्ट्री ठेकेदाराने रेशन लाभार्थ्यांचा डेटा चुकीचा भरला आहे.

त्यामूळेच धान्य वाटपावेळी अनेकांच्या अंगठ्याचे ठसे जुळत नाहीत. परिणामी धान्य वाटपात अडथळे येत असून त्याचा परिणाम म्हणजे दुकानदारांना वाढीव कमिशन मिळणे झाले आहे. त्यामुळेच मशिनची समस्या लवकर सोडविण्याबरोबरच दुकानदारांना कमिशन द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

याबाबत अधिकारयांना सांगुन मशिन बदलुन देण्यात येतील असे आश्वासन बापट यांनी दुकानदारांना दिले. यावेळी रेशन दुकानदार संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे-पाटील, जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे, सतीश आमले, महेश सदावर्ते, गिरीश कुलकर्णी, धोंडीराम आव्हाड उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*