पीओएसव्दारे खत विक्रीला सुरुवात

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – पीओएस मशिनच्या माध्यमातून चालू खरीप हंगामात खत विक्रीला सुरुवात झाली आहे.आधारक्रमांक आवश्यक असून अंगठ्याचा ठसा दिल्यावरच बिल मिळणार आहे. पॉइंट ऑफ सेल (पीओएस) मशिनवापराबाबत यापूर्वी प्रशिक्षण देण्यात आले आहे.
शेतकर्‍यांनी खरीप हंगामात वेळीच खते खरेदी करावीत.असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती अजय फटांगंरे व जिल्हा कृषी विकास अधिकारी विलासकुमार राठी यांनी केले आहे.
जिल्ह्यात एकूण 1491 खत विक्रेते पात्र असून त्यापैकी 762 विक्रेत्यांना पीओएस मशिनचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यांच्याकडील खतसाठाही मशिनमध्ये नोंदविण्यात आला आहे. दरम्यान पंचायत समितीस्तरावर पुन्हा संबंधित विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*