Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

ठाकरे सरकारचे खातेवाटप; कुणाला कोणते खाते जाणून घ्या एका क्लिकवर

Share

मुंबई | प्रतिनिधी 

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचे खातेवाटप रखडले होते. अखेर आज खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नजरा खिळलेल्या घटनेवर आज महाविकास आघाडीचे शिक्कामोर्तब झाले आहे.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद आणि कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग असतील.

शिवसेनेचे एकनाथ संभाजी शिंदे यांच्याकडे  गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण ही मंत्रिपद असतील.

छगन चंद्रकांत भुजबळ ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन हि मंत्रिपदे असतील.

विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय हि मंत्रिपदे असतील.

सुभाष राजाराम देसाई  यांच्याकडे उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास हि मंत्रिपदे असणार आहेत.

जयंत राजाराम पाटील वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास हि मंत्रिपदे असतील.

डॉ. नितीन काशिनाथ राऊत सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण हि मंत्रिपदे असतील.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!