परिवहन विभागाचे पोर्टल सुरू

0

प्रादेशिक परिवहनकडून आवाहन

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – प्रादेशिक विभागातील सर्व कामे वेळेवर आणि लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी परिवहन विभाग आता केंद्र सरकारच्या www.parivahan.gov.in या वेबसाईडशी आता नाशिकदेखील जोडले गेले आहे. हे पोर्टल अपग्रेड झाल्यामुळे नागरिकांनी आता या पोर्टलचा वापर करावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी केले आहे.
या पोर्टलमुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजात पारदर्शकता व गतिमानता येत आहे. या वेबसाईडमुळे ऑनलाईन कामे अधिकाधिक होऊ लागली आहेत. त्यामुळे नागरिकांनी बर्‍याचवेळा हेलपाटे घालावे लागत होते ते आता या पोर्टलमुळे वाचणार आहेत. तसेच या विभागाच्या अखत्यारीत कामासाठी रांगा लावण्याचीही गरज नाही. वाहन परमीट, वाहन परवाने इ. सर्व वाहन संबंधित सेवा उपलब्ध केल्या आहेत.
वाहन फिटनेस तत्सम प्रमाणपत्र आता ऑनलाईन मिळणार आहेत. यापूर्वी सारथी नाईस इन ही वेबसाईड होती आतापर्यंत 50 पैकी 42 कार्यालय parivahan.gov.in या वेबसाईडशी जोडली आहेत. एकाच पोर्टलवर सर्व सेवा मिळणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या पोर्टलचा वापर जास्तीत जास्त करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*