पूजा सावंत ‘प्रेग्नंट’! चित्रपटसृष्टीत चर्चेला उधाण!

0
पूजा गरोदर असल्याचे दिसणाऱ्या फोटोजने मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेला उधाण आले आहे.

या फोटोमागे नक्की काय आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हा चित्रपटाच्या प्रमोशनचा एक फंडा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हा सगळा तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी घातलेला घाट आहे.

हा फोटो म्हणजे तिच्या आगामी ‘लपाछपी’ चित्रपटातील हे एक दृश्य असून, तेच या फोटोमुळे चर्चेत आलं आहे.

या फोटोसोबत पूजाला १४ जुलैची ‘ड्यू डेट’ देण्यात आल्याचं म्हटलं जात होतं.

पण ते सुद्धा एक प्रमोशनच आहे. ही ‘ड्यू डेट’ म्हणजेच तिच्या ‘लपाछपी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आहे.

येत्या १४ जुलैला राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.

त्यामुळे ही तारीख प्रेक्षकांवर बिंबवण्यासाठीच या पद्धतीने ती रंगवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*